असं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा व्यापारी या आपल्या नातवासोबत घराच्या हॉलमध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा मिलिंद हा त्यांच्याजवळ आला. त्याच्या पत्नीशी झालेल्या संभाषणाचे मोबाईलमधील रेकॉर्डिंग कोणी डिलीट केले, या कारणावरून त्याने आईला झोपेतून उठवून वाद घालायला सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर मुलाचा संताप अनावर
वाद वाढत गेल्यानंतर मिलिंदने आईला शिवीगाळ करत त्यांच्या तोंडावर चापट्या मारल्या. त्यानंतर कपाटातील बनियनचा बोळा करून तो त्यांच्या तोंडात कोंबला. एवढ्यावरच न थांबता त्याने एका हाताने गळा आवळत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
advertisement
या घटनेनंतर आरोपी मिलिंद हा घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेतील पोलिस शिपाई रामदास उगले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
