आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या बहुप्रतिक्षित तिसर्या मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 2026 मध्ये तिसर्या मार्गाचा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. या तिसऱ्या मार्गिकेचा सर्वाधिक फायदा कसारा- आसनगांव- टिटवाळा स्थानकांतील प्रवाशांना सर्वाधिक फायदा होईल. या मार्गावरील लोकल्सना कायमच तुडुंब गर्दी असते. अशातच ही तिसरी लाईन आसनगाव, कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरले. तिसऱ्या लाइनचं काम अंतिम टप्प्यात आहे.
advertisement
कसारा आणि आसनगाव दरम्यानचा पहिला टप्पा 2026 मध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती, मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. नेमका हा पहिला टप्पा केव्हापर्यंत सुरू होणार? ही माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थात MUTP अंतर्गत येणाऱ्या या नवीन प्रकल्पाचं उद्देश या अतिशय गर्दीच्या उपनगरीय मार्गावरील गर्दी कमी करणं आणि रेल्वे वाहतूक सुधारणं हा आहे. कल्याण- कसारा 67 किमी अंतर आहे. तर, कल्याण- कसारा मार्गावरील आसनगाव ते कसारा मार्ग 35 किमी लांबीचा आहे. याच मार्गावरुन केवळ दोन ट्रॅकवर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या अशा दोन्ही गाड्या धावतात.
त्यामुळेच तिसरी लाईन झाल्यास याचा फायदा येथील प्रवाशांना होईल. आसनगाव- कसारा ही तिसरी लाईन उपनगरीय लोकलसाठी असेल. कसारा- आसनगाव या तिसऱ्या प्रकल्पाला 2011 च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 2016 पासून या लाइनच्या कामाला सुरूवात झाली होती. आता अखेर कसारा- आसनगांव दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच काम अंतिम टप्प्यात आलं असून 2026 पर्यंत ते पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ही तिसरी लाईन एकदा पूर्ण झाल्यानंतर कसारा येथे अतिरिक्त गाड्या चालवता येतील, या अतिरिक्त लोकलमुळे गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल.
