जमुई : आपण आपल्या घरात ज्याप्रकारच्या वस्तू ठेवतो त्याच प्रकारची ऊर्जा आपल्या घरात असते. असे म्हटले जाते की, ज्या वस्तूंमुळे घरातील सकारात्मकतेवर प्रभाव पडेल, अशा वस्तू अजिबात घरात ठेवू नये. मात्र, तरीही लोक आपल्या घरात जुन्या वस्तू फेकण्याऐवजी घरात त्यांना सांभाळून ठेवतात. हे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या घरात एक अशी वस्तू ठेवाल तर तुम्ही कंगाल होण्याची शक्यताही जास्त आहे.
advertisement
इतकेच नव्हे तर या वस्तूमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त राहते आणि असे करणे तुमच्यासाठी अत्यंत कठीण परिस्थिती ओढवून घेऊ शकते. याबाबत ज्योतिषाचार्य पंडित मनोहर आचार्य यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, घरात बऱ्याच गोष्टी ठेवण्यास मनाई आहे, त्यापैकी बंद घड्याळमुळे तुमच्या कुटुंबात एक प्रकारची आपत्ती येऊ शकते.
बंद घड्याळ ठेवू नये -
ज्योतिषाचार्य पंडित मनोहर आचार्य यांनी सांगितले की, अनेकदा एखादी गोष्ट जुनी झाल्यानंतर आपण ती घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात सुरक्षितपणे ठेवतो. लोक भिंतीवर टांगलेल्या घड्याळाचेही असेच करतात. घड्याळ खराब झाले किंवा थांबले तर ते काढून घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ठेवले जाते. मात्र, वास्तूनुसार, घरात बंद घड्याळ ठेवल्याने पॉझिटिव्ह एनर्जी कमी होते. घरात बंद घड्याळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यामुळे घरात तणावाचे वातावरण उत्पन्न होते आणि ही नकारात्मक ऊर्जा अनेक समस्यांना कारणीभूत ठरते.
चुकूनही करू नका ही चूक -
ज्योतिषाचार्य यांनी सांगितले की, घरात अशा प्रकारची घड्याळ ठेवण्याची चूक अजिबात करू नये. त्यांनी सांगितले की, घरात बंद घड्याळ ठेवल्याने धन संपत्तीचा नाश होतो. तसेच गृह स्वामी कंगालीकडे जातो. ज्यामुळे घरात तणावाचे वातावरण असते, त्यावेळी घरातील लोक कधीची विकास करू शकत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या घरातील बंद घड्याळ ठेवली असेल तर तिला लगेच काढून फेकून द्यावी.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी चर्चा केल्यानंतर लिहिली आहे. कोणतीही घटना, अपघात किंवा नफा-नुकसान हा निव्वळ योगायोग असेल. ज्योतिषांकडून मिळालेली माहिती ही सार्वजनिक आहे. लोकल-18 याबाबत कोणताही दावा करत नाही.