डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जगभरात प्रत्येक वर्षी 60 कोटी जण दूषित अन्नामुळं आजारी पडतात. जवळपास 4 लाख 20 हजार नागरिक यामुळे आपला जीव गमावतात. वर्षानुवर्षं दूषित अन्न खाल्ल्यामुळेसुद्धा अनेकांना आजरपण येत असतं. खाण्याच्या चुकीच्या सवयी याला जबाबदार आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात एक सूचना केली आहे. स्वयंपाक केल्यानंतर किती वेळात जेवणं चांगलं असतं, याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वं या संघटनेने जारी केली आहेत. यामुळे भविष्यात अन्नाशी संबंधित आजारांचा धोका कमी करता येईल. याच मार्गदर्शक तत्त्वांमधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक केल्यानंतर लगेचच जेवणं.
advertisement
Tea : जेवल्यानंतर चहा पिता? मग त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम एकदा वाचाच, सवय सोडून द्याल
स्वयंपाकानंतर लगेचच जेवावं?
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार स्वयंपाकानंतर लगेच जेवलं पाहिजे. स्वयंपाक करताना त्यात असलेले हानिकारक विषाणू जवळपास नष्ट झालेले असतात. शिजवलेलं अन्न थंड होण्यासाठी ठेवलं तर त्यात पुन्हा विषाणू वाढीस लागू शकतात. यातून अन्नासंबंधीचे आजार होण्याची शक्यता वाढते.
उशिरा जेवण्याचा परिणाम
तज्ज्ञ सांगतात, की काही पोषकतत्त्वं, व्हिटॅमिन्स उष्णता, हवा आणि प्रकाश यांच्या संपर्कात दीर्घ काळ राहिल्यास संवेदनशील होत असतात. पदार्थ तयार करून ठेवल्यानंतर उशिरा खाल्ल्यास अन्नातल्या घटकांची हानी होण्याची शक्यता असते.
Pickle impact on Health : लग्नानंतर लोणचं खाणं धोक्याचं, मूल होण्यात अडथळा ठरतं?
पदार्थांची चव उतरते
स्वयंपाकानंतर जेवण तसंच ठेवलंत तर नंतर जेवताना त्या पदार्थाची चव थोडी कमी झाल्याचं तुम्हाला जाणवेल. ताज्या अन्नाच्या तुलनेत त्याची चव थोडी कमीच होते आणि ते पुन्हा गरम केलं तर पहिल्यांदा आलेली चव पुन्हा येणार नाही. स्वयंपाकाच्या काही पद्धतींमध्ये अन्न शिजताना रासायनिक प्रक्रिया होते. स्वयंपाक करून झाल्यानंतर काही रासायनिक प्रक्रिया होऊ शकते. अन्न शिजल्यानंतर उशिरा जेवल्यास अल्टरेशनची स्थिती निर्माण होऊ शकते.