TRENDING:

Operation Sindoor: एक गोळी, अनेक पक्षी: 'ऑपरेशन सिंदूर'नं असा घेतला दहशतवादी हल्ल्यांचा बदला

Last Updated:

कधी संसद हल्ला, कधी कंधार विमान अपहरण, कधी २६/११ चा मुंबईवर हल्ला हे सगळं कोणताही भारतीय विसरला नव्हता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक सैनिकी ऑपरेशन नव्हतं. 'ऑपरेशन सिंदूर' म्हणजे विस्मरणाच्या धुळीत गेलेल्या रक्तरंजित आठवणींना न्याय मिळवून देण्याची निर्णायक कारवाई होती. कधी संसद हल्ला, कधी कंधार विमान अपहरण, कधी २६/११ चा मुंबईवर हल्ला हे सगळं कोणताही भारतीय विसरला नव्हता. पण दहशतवाद्यांवर कारवाई कधी होणार हेच प्रश्नचिन्ह कायम होते. पण अखेर ऑपरेशन सिंदूरमधून ते उत्तर मिळालं.
advertisement

फक्त हल्ला नव्हे, 'हिशोब'

भारतानं पाकिस्तान आणि  पाकव्याप्त भागामध्ये अचूक कारवाई करत पाच प्रमुख दहशतवाद्यांना ठार मारलं. ही कारवाई काही एका हल्ल्याचा सूड नव्हता, तर दशकानंतर मिळालेला सामूहिक न्याय होता.

 पहलगामच्या हत्यांची किंमत चुकवणारे दहशतवादी ठार

या दहशतवाद्यांनी केवळ सुरक्षा दलांवर नाही, तर निष्पाप काश्मिरी नागरिकांवरही हल्ले केले होते.  त्यांची हुकूमशाही पाकिस्ताननं आजवर झाकून ठेवली होती.

advertisement

ठार झालेले टॉप दहशतवादी:

मुदस्सर खडियन खास उर्फ अबू जुंदाल

संघटना: लष्कर-ए-तोयबा

मुरीदके येथील Markaz Taiba चा ऑपरेशन प्रमुख.

हाफिज मुहम्मद जमील

संघटना: जैश-ए-मोहम्मद

मौलाना मसूद अझहर याचा मेव्हणा. बहावलपूरच्या Subhan Allah सेंटरचा प्रमुख. युवकांच्या ब्रेनवॉशिंग आणि आर्थिक घडामोडींचा सूत्रधार.

मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्तादजी / मोहम्मद सलीम / घोषी साहब

advertisement

संघटना: जैश

IC-814 विमान अपहरण प्रकरणातील संशयित, आणि जैशच्या शस्त्र प्रशिक्षणाचा प्रमुख. मसूद अझहरचा सासरा.

खालिद उर्फ अबू अकाशा

संघटना: लष्कर

कश्मीरमध्ये अनेक ऑपरेशनचा मास्टरमाइंड. अफगाणिस्तानमधून शस्त्र तस्करीत गुंतलेला.

मोहम्मद हसन खान

संघटना: जैश

PoK मधील जैशचा कमांडर मुफ़्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा. जम्मू-काश्मीरमधील टार्गेटेड हल्ल्यांत प्रमुख भूमिका.

पठाणकोट आणि संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड 'रऊफ अझहर' ठार

advertisement

अब्दुल रऊफ अझहर — जैशचा वरिष्ठ नेता, मसूद अझहरचा भाऊ. पठाणकोट एअरबेस हल्ला, संसद हल्ला आणि IC-814 अपहरण, या  तीनही प्रकारांचा हा सूत्रधार होता. या दहशतवाद्याचा खात्मा करून भारताने मागील अनेक पाकिस्तानाच्या कारवायांचा एकाप्रकारे बदला घेतला.

 २६/११ चे अड्डे झाले राख

मुंबई हल्ल्यात जे दहशतवादी आले ते केवळ अजमल कसाब आणि हेडली नव्हते, त्यांच्या मागे 'तयारी करणारे अड्डे' होते. बहावलपूर, मुरीदके येथील लष्कर आणि जैशचे ट्रेनिंग कॅम्प्स जिथून २६/११ च्या हल्लेखोरांना तयार केलं गेलं, ते अड्डे या ऑपरेशनमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलं.

advertisement

 डॅनियल पर्ल हत्या आणि अल-कायदाशी जोडलेले नेटवर्कही उद्ध्वस्त

2002 मध्ये अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांची हत्या झाली. त्यामागे अल-कायदा आणि जैशचं नेटवर्क होतं.  त्या नेटवर्कवरही सिंदूर ऑपरेशननं थेट प्रहार केला.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Operation Sindoor: एक गोळी, अनेक पक्षी: 'ऑपरेशन सिंदूर'नं असा घेतला दहशतवादी हल्ल्यांचा बदला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल