TRENDING:

IND VS PAK : सीमारेषेवर टेन्शन वाढलं, भारतीय रेल्वेनं सुद्धा घेतला मोठा निर्णय, केले महत्त्वाचे बदल

Last Updated:

सीमेलगतच्या अनेक भागामध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू आहे. भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. भारताने खबरदारी म्हणून

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : भारत सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. मागील तीन दिवसापासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून भ्याड हल्ले सुरूच आहे. सीमेलगतच्या अनेक भागामध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू आहे. भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. भारताने खबरदारी म्हणून सीमेजवळील काही भागांमध्ये विमानसेवा बंद केली आहे. तर भारतीय रेल्वेनं सुद्धा सीमेलगतच्या भागात रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
advertisement

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रात्रीच्या वेळी रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.  रात्रीच्या वेळी अमृतसर, भटिंडा, फिरोजपूर, जम्मू सारख्या ठिकाणांहून जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आता बदलले जाणार आहे. या ठिकाणांहून जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलून सकाळी धावतील. त्याचबरोबर कमी अंतराच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

रात्री अमृतसर, जम्मू आणि फिरोजपूर सारख्या सीमावर्ती भागात पोहोचणाऱ्या गाड्या सकाळी तिथे पोहोचणार आहे.  या निर्णयामुळे १५ हून अधिक गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणण्यासाठी, रेल्वेनं दिवसा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसा धावणाऱ्या सर्व गाड्या नेहमीप्रमाणे धावणार आहे, असंही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं. सीमारेषेजवळील भागामध्ये  संध्याकाळी ब्लॅकआउट लावला जात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

 सीमारेषेवर ड्रोन हल्ले आणि गोळीबार

पाकिस्तानच्या कुरापतीमुळे सीमारेषेजवळील भागामध्ये संध्याकाळी ब्लॅकआऊट लावला जात आहे. अंधाराचा फायदा घेऊन पाकिस्तान सैन्याकडून मागील ३ दिवसांपासून ड्रोन हल्ले केले जात आहे. एवढंच नाहीतर जम्मूमधील अनेक भागामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. या गोळीबारामध्ये जम्मूमध्ये नागरी वस्तीचं मोठं नुकसान झालं आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात जम्मूमध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही पाकिस्तानी सैन्याकडून हल्ले सुरू आहे. भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे सगळे हल्ले परतावून लावले आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
IND VS PAK : सीमारेषेवर टेन्शन वाढलं, भारतीय रेल्वेनं सुद्धा घेतला मोठा निर्णय, केले महत्त्वाचे बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल