म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी 2026 मध्ये 2,000 घरांच्या लॉटरी निघणार आहेत. कोकण मंडळाकडून दोन हजार घरांसाठीची जाहिरात फेब्रुवारी महिन्यात काढली जाणार असून एप्रिल- मे महिन्यात लॉटरी निघणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुंबई उपनगरांमध्ये सध्याच्या घडीला घराच्या किंमती फारच गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तीला मुंबई आणि उपनगरामध्ये घर घेणं खिशाला परवडण्या सारखे नाही. त्यामुळे लाखो लोकं म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाची ऑक्टोबरमध्ये घरांच्या लॉटरीची जाहिरात येणे अपेक्षित होती. मात्र, पुरेसे घरे उपलब्ध नसल्याने लॉटरी जाहीर झाली नव्हती. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
advertisement
दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात दोन हजारांहून अधिक घरांची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळणाऱ्या 15 टक्के आणि 20 टक्क्यांमधूनच मिळणाऱ्या घरांबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून घर घेऊ इच्छिणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे. कोकण मंडळाच्या ठाणे आणि कल्याण परिसरातील घरांना मोठी मागणी आहे. 2025 मध्ये 5 हजार घरांसाठी दीड लाख अर्ज आले होते. त्यामुळे यावेळीदेखील लॉटरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती जरीही काही प्रमाणात कमी असून नागरिकांचा त्याकडे सर्वाधिक असतो.
