TRENDING:

एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांच्याशी भेट

Last Updated:

नरेंद्र मोदी आणि पेट्टेरी ओर्पो यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराचे स्वागत केले, तंत्रज्ञान, 6G, नवीकरणीय ऊर्जा आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फिनलंडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांची भेट घेतली.
News18
News18
advertisement

16 व्या भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेत नुकत्याच संपन्न झालेल्या भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. हा करार सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत-युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारीच्या भावनेतून द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.

advertisement

भविष्यातील आर्थिक वाढ आणि विकासासाठी डिजिटलायझेशन तसेच शाश्वततेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर नेत्यांनी भर दिला. या संदर्भात, दोन्ही देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या परस्परांच्या अर्थव्यवस्थांमध्ये विस्तारित कार्य आणि भागीदारीद्वारे वाढती उपस्थिती दर्शवत असल्याचे सांगून त्यांनी याचे स्वागत केले. फिनलंडच्या पंतप्रधानांनी भारताच्या न्याय्य आणि समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले.

नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.यात क्वांटम आणि 6G, नवीकरणीय ऊर्जा, चक्राकार  अर्थव्यवस्था आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे.

advertisement

दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक विकास तसेच जागतिक प्रशासनात अधिक सहकार्य यावर देखील विचारांची देवाणघेवाण केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाय गमावला Cricket सोडलं नाही! व्हिलचेअरवर मॅच खेळणाऱ्या ओंकारची गोष्ट!
सर्व पहा

या वर्षाच्या अखेरीस तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत पुन्हा भेटण्यासह द्विपक्षीय संबंध वाढविण्याप्रति  दोन्ही नेत्यांनी उत्सुकता दर्शविली.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांच्याशी भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल