TRENDING:

विज्ञानाचा सर्वात मोठा यू-टर्न, या एका धडकेने सारे बदलले; पृथ्वीचा अक्ष झुकला, रात्र-दिवस ठरले आणि भरती-ओहोटीचा जन्म झाला

Last Updated:

Earth And Theia Collision: 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीला धडक देणाऱ्या ‘थीआ’ या रहस्यमय ग्रहसदृश्य वस्तूबद्दलच्या नवीन संशोधनाने विज्ञानक्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. पृथ्वी आणि चंद्राच्या खडकांतील समान रासायनिक संकेतांमधून दोघेही एकाच ‘कॉस्मिक शेजारात’ जन्माला आल्याचे स्पष्ट झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

जवळपास ४.५ अब्ज वर्षांपूर्वीची, पृथ्वीचा संपूर्ण इतिहास बदलून टाकणारी ती टक्कर आजही विज्ञानातील सर्वात रहस्यमय घटनांपैकी एक मानली जाते. त्यावेळी एका विशाल खगोलीय ग्रहसदृश्य वस्तूने तरुण पृथ्वीला धडक दिली होती. या वस्तूला वैज्ञानिक 'थिआ' (Theia) या नावाने ओळखतात. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार, थीआ मंगळाच्या आकाराचा होता आणि या धडकेमुळे केवळ पृथ्वीचा आकार बदलला नाही, तर चंद्राचा (Moon) जन्मही झाला.

advertisement

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनात वैज्ञानिकांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या मते, थीआ हा कोणताही अनोळखी किंवा भटकणारा ग्रह नव्हता, तर तो पृथ्वीचा 'कॉस्मिक शेजारी' होता आणि तो सौरमालेच्या त्याच भागात तयार झाला होता, जिथे आपली पृथ्वी तयार झाली.

advertisement

पृथ्वी आणि चंद्राच्या खडकांमध्ये 'थीआ'चे रासायनिक संकेत: थीआ पूर्णपणे नष्ट झाला असला तरी, त्याचे रासायनिक संकेत (Chemical Signatures) आजही पृथ्वी आणि चंद्राच्या खडकांमध्ये लपलेले आहेत. या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील 15 खडक आणि अपोलो मिशनद्वारे आणलेल्या चंद्राच्या ६ नमुन्यांचा अभ्यास केला. धातूंच्या समस्थानिकांचे (Metal Isotopes) विशेषत: लोह (Iron), क्रोमियम (Chromium), मॉलिब्डेनम (Molybdenum) आणि झिरकोनियम (Zirconium) उच्च-अचूकतेने (High-Precision) विश्लेषण करण्यात आले.

advertisement

या विश्लेषणातून असे दिसून आले की पृथ्वी आणि चंद्राचे समस्थानिक तंतोतंत सारखे आहेत. या समानतेवरून हे स्पष्ट होते की, टक्कर झाल्यानंतर दोन्ही ग्रहांचे घटक वितळले आणि स्थायी स्वरूपात मिसळून गेले. या एकरूपतेमुळेच थीआ आणि पृथ्वीचे 'बिल्डिंग ब्लॉक्स' एकाच भागातून आले असावेत, असा निष्कर्ष काढण्यात आला.

advertisement

'रिव्हर्स इंजिनियरिंग'द्वारे 'थीआ'ची निर्मिती: प्रत्यक्ष पुरावे नसल्यामुळे, वैज्ञानिकांनी 'रिव्हर्स इंजिनियरिंग'चा (Reverse Engineering) एक अनोखा मार्ग अवलंबला. त्यांनी संगणकीय मॉडेलच्या (Computer Model) मदतीने असा अंदाज लावला की, जर आज पृथ्वी आणि चंद्राचे समस्थानिक सारखे असतील, तर थीआमध्ये कोणते घटक कोणत्या प्रमाणात असावेत.

हे मॉडेल केवळ एकाच निष्कर्षावर पोहोचले: थीआ आणि पृथ्वी दोन्ही सौरमालेच्या आतील भागात तयार झाले होते. याचा अर्थ थीआ दूरवरून आलेला नव्हता, तो पृथ्वीचा शेजारी होता. संशोधनानुसार थीआ पृथ्वीपेक्षाही सूर्याच्या अधिक जवळच्या भागातून आला होता. मुख्य संशोधक टिम होप्प (Timo Hopp) यांनी सांगितले की, "सर्वात मान्य मॉडेल हेच दर्शवतो की थीआ आणि पृथ्वी दोन्ही एकाच भागातील ग्रह होते. ते 'कॉस्मिक शेजारी' होते."

टक्कर आणि चंद्राची निर्मिती: या टक्करानंतर चंद्राचा बराचसा भाग थीआपासून आला, असे बहुतेक मॉडेल सांगतात. मात्र नवीन समस्थानिक डेटा (Isotope Data) दर्शवतो की थीआ आणि पृथ्वीची रासायनिक संरचना इतकी जुळणारी होती की, टक्कर झाल्यावर दोन्हीचे घटक वितळून पूर्णपणे मिसळून गेले असावेत.

या महाकाय धडकेमुळेच पृथ्वीला आजचे स्वरूप मिळाले:

पृथ्वीचा आकार बदलला.

तिचा अक्ष झुकला.

तिची कक्षा बदलली.

चंद्राचा जन्म झाला आणि भरती-ओहोटी निर्माण झाली.

तिची हवामान प्रणाली स्थिर झाली आणि रात्र-दिवसाचे स्वरूप निश्चित झाले.

नवीन संशोधनानुसार सुरुवातीच्या सौरमालेत पृथ्वीच्या अगदी जवळ एक मंगळासारखा ग्रह विकसित होत होता. जो नंतर पृथ्वीला धडकला आणि पृथ्वीची कथा कायमस्वरूपी बदलून गेली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
विज्ञानाचा सर्वात मोठा यू-टर्न, या एका धडकेने सारे बदलले; पृथ्वीचा अक्ष झुकला, रात्र-दिवस ठरले आणि भरती-ओहोटीचा जन्म झाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल