...अशी होणार निवड
2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाच विशेष बाब म्हणून पोलीस भरतीचा अर्ज सादर करता येणार आहे.. राज्यभरात पात्र झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर उमदेवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवडयादी जाहीर होणार आहे.
advertisement
एकाच दिवशी होणार परीक्षा
राज्यभरात 15 हजार पोलीस शिपायांची भरती होणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक या शहरांत ही संख्या मोठी आहे. या भरतीमध्ये वाहनचालक आणि पोलीस शिपाई पदासाठी निवडी केल्या जाणार आहेत, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठी उमदेवारांना एकाच अर्जाची परवानगी आहे. एकाच दिवशी लेखी परीक्षा, प्रथम 50 गुणांचा शारीरिक चाचणी आणि त्यानंतर एका पदासाठी 10 उमदेवारांची निवड करण्यात येणार आहे.
खाकीचं स्वप्न पूर्ण होणार
पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ही मोठी संधी आहे. त्यामुळे मुलांची तयारीही जोरदार सुरु आहे. सध्या अर्ज नोंदणीवर उमेदवारांची लक्ष लागून राहिलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले की, पोलीस भरतीची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा : Marathwada Weather: मराठवाड्यात हवापालट, मुसळधार पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हे ही वाचा : ई पीक पाहणी करताना अडचण येतेय का? तुमच्या मोबाईलमध्ये 2 गोष्टी तातडीने करून घ्या