TRENDING:

इमरान खान यांच्यासोबत तुरुंगात काय झालं? घातपाताच्या संशयाने पाकिस्तानात खळबळ, 21 दिवसांत एकही भेट नाही

Last Updated:

Imran Khan: अदियाला तुरुंगात ठेवलेल्या इमरान खान यांच्या आरोग्याबद्दलच्या अफवांनी पाकिस्तानात मोठी खळबळ उडवली आहे. 21 दिवसांपासून कुटुंबीयांनाही भेट दिली जात नसल्याने त्यांच्या तब्येतीवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

रावळपिंडी: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या आरोग्याविषयी सध्या पाकिस्तानात अनेक अफवांचे पीक आले आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असलेल्या इमरान खान यांची प्रकृती ठीक नसल्याची जोरदार चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू आहे. या अफवांना बळ देणारी बाब म्हणजे, गेल्या 21 दिवसांपासून इमरान खान यांच्या तीन बहिणींना त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली गेलेली नाही.

advertisement

कोर्टाने परवानगी देऊनही तुरुंग प्रशासनाकडून ही भेट वारंवार नाकारली जात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इमरान खान यांच्या बहिणींनी या संपूर्ण प्रकाराबद्दल पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या आयजी (Inspector General) कडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या बहिणींचा मुख्य आरोप आहे की, तुरुंग प्रशासन किंवा सरकारकडून इमरान खान नेमके कुठे आहेत आणि त्यांच्या आरोग्याची स्थिती कशी आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती पुरवली जात नाहीये.

advertisement

इतकंच नव्हे तर, इमरान खान यांची बहीण नूरीन यांनी अदियाला तुरुंगाबाहेर आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या 'क्रूर हल्ल्या'बद्दलही पंजाब आयजी यांच्याकडे औपचारिक तक्रार केली आहे. अफगाणिस्तानच्या माध्यमांमध्येही इमरान खान यांच्यावर होत असलेल्या कथित गैरव्यवहारांबद्दल भाष्य केले जात आहे आणि पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत.

advertisement

इमरान खान यांना ऑगस्ट 2023पासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने त्यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपानुसार, या प्रकरणात इमरान खान यांनी त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यासोबत मिळून भ्रष्टाचार केला.

advertisement

क्रिकेटरमधून राजकारणी बनलेल्या इमरान खान यांच्यावर असा आरोप आहे की, त्यांनी ट्रस्टच्या नावाखाली रियल इस्टेट टायकून मलिक रियाज हुसैन यांच्याकडून 60 एकर जमीन दान म्हणून घेतली, ज्यामुळे देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी जानेवारी 2025मध्ये न्यायालयाने खान यांना 14 वर्षांची तर बुशरा यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त इमरान खान यांच्यावर पाकिस्तानमध्ये इतरही अनेक कायदेशीर खटले सुरू आहेत. त्यांच्या आरोग्याबद्दलचे गूढ कायम असल्याने पाकिस्तानमध्ये राजकीय तणाव वाढला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अपघात झाला अन् आयुष्याला मिळाले वेगळे वळण,स्वप्नीलचा वन मॅन बँड,करतोय अनोखे काम
सर्व पहा

मराठी बातम्या/ बातम्या/विदेश/
इमरान खान यांच्यासोबत तुरुंगात काय झालं? घातपाताच्या संशयाने पाकिस्तानात खळबळ, 21 दिवसांत एकही भेट नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल