किती वाजेपर्यंत घेता येणार दर्शन
सप्तशृंगी देवीचे मंदिर 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत रोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार आहे. या काळात भाविक दिवसभर आणि संध्याकाळपर्यंतही देवीचे दर्शन घेऊ शकतील. या निर्णयामुळे गर्दी नियंत्रणाखाली राहील आणि भाविकांना सोयीस्कर सुविधा मिळेल.
भक्तांच्या सोयीसाठी रोप वे सुरु
advertisement
गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रोप वे ट्रॉलीची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे. ही सुविधा सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे गडावर जाणं आणि दर्शन घेणं अधिक सोपं आणि सुरक्षित होईल.
मंदिर प्रशासनाने दिवाळीच्या सणात भक्तांसाठी अनेक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे भक्तांना दर्शनासाठी मोठी गर्दी, उशीर किंवा गैरसोय भासणार नाही. भक्तांनी मंदिराच्या वेळापत्रकानुसार योजना आखून दर्शनासाठी यावे अशी शिफारस करण्यात आली आहे.
सप्तशृंगी गडावरील मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना मंदिर प्रशासनाकडून सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिरात साफसफाई, दर्शनासाठी योग्य रस्ता आणि रोप वेची सुविधा सतत उपलब्ध राहणार असल्याने भक्तांना आरामात दर्शन घेता येईल. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने प्रत्येक भाविकाच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. रोप वे ट्रॉली आणि मंदिर खुल्या वेळा लक्षात घेता भक्तांना आरामात आणि सुरक्षितपणे देवीचे दर्शन घेता येईल.