TRENDING:

घर चालवण्यासाठी विकली भाजी, आज प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य, अंकुश चौधरीचा शहारे आणणारा प्रवास

Last Updated:

Ankush Choudhary Birthday : आज ३१ जानेवारीला अंकुश चौधरी आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे अंकुश आणि दीपाच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आजच आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ankush Choudhary Birthday : अभिनेता अंकुश चौधरी हा अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आहे. 'दुनियादारी'मधला दिघ्या असो किंवा मग 'गुरू', 'दगडी चाळ' मधील सूर्या असो किंवा मग 'क्लासमेट'मधील सत्या आपल्या प्रत्येक पात्रात त्याने जीव ओतला आहे. त्याने नेहमी प्रत्येक भूमिका कमालीची वठवली आहे. आज ३१ जानेवारीला अंकुश चौधरी आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे अंकुश आणि दीपाच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आजच आहे.
आज ३१ जानेवारीला अंकुश चौधरी आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
आज ३१ जानेवारीला अंकुश चौधरी आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
advertisement

३१ जानेवारी १९७३ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात अंकुश चौधरीचा जन्म झाला. चाळीत वाढलेल्या अंकुशचा चित्रपटसृष्टीपर्यंतचा हा प्रवास अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. घराची परिस्थिती तशी बेताची असल्याने, कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून अंकुश भाजी विकायचा. पण अभिनयाप्रती असलेल्या आवडीमुळे तो चाळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी भाग घ्यायचा. इथूनच त्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

advertisement

शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातून अंकुशला पहिली मोठी संधी मिळाली. या कार्यक्रमात अंकुश अनेक कलाकारांसोबत शेवटच्या रांगेत नृत्य करायचा. याच कार्यक्रमादरम्यान अंकुशची भरत जाधव, केदार शिंदे व संजय नार्वेकर या कलाकार मित्रांशी ओळख झाली. केदार शिंदेसोबत अंकुशने अनेक एकांकिका केल्या. त्याच्या 'ऑल द बेस्ट' या नाटकानेच अंकुश चौधरीला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली.

advertisement

Alia Bhatt : जर्मनीत पुर्वज, हिटलरसोबत खास नातं, आलिया भट्टला कशी मिळाली ब्रिटिश नागरिकता? 

कॉलेजला असताना अंकुशची दीपाशी भेट झाली. दीपा परब आणि अंकुश चौधरी यांचे शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झाले. दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवड त्यामुळे कॉलेजच्या नाटक-एकांकिकांमुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कॉलेजमध्ये असताना या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले होते. अंकुश चौधरी आणि दीपा परब एकमेकांना १० वर्षे डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये लग्न केले होते. आज त्यांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

अंकुशने 'सावरखेड एक गाव', 'आई शपथ', 'मातीच्या चुली', 'यंदा कर्तव्य आहे', 'संशय कल्लोळ', 'चेक मेट', 'गैर', 'ब्लफमास्टर', 'डबल सीट', 'क्लासमेट', 'गुरु', 'दगडी चाळ' आणि 'दुनियादारी'सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
घर चालवण्यासाठी विकली भाजी, आज प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य, अंकुश चौधरीचा शहारे आणणारा प्रवास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल