Alia Bhatt : जर्मनीत पुर्वज, हिटलरसोबत खास नातं, आलिया भट्टला कशी मिळाली ब्रिटिश नागरिकता?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
How did Alia Bhatt get British citizenship : एका मुलाखतीत तिच्या आयुष्यतील खाजगी गोष्टींबद्दल भाष्य केलं होतं, ज्यामधून आलियाचं जर्मनीशी खास नातं असल्याचं समोर आलं.
मुंबई : 2012 साली आलेल्या 'स्टूडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून पदार्पण करणारी आलिया भट्ट आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रणबीर कपूरसह लग्न केल्यानंतर आणि मुलीच्या जन्मानंतरही आलिया अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच कार्यरत असलेली पाहायला मिळते. आलियाचे चित्रपट व तिच्या अभिनयामुळे तिला सगळेच ओळखतात पण तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी कदाचितच कुणाला माहीत असतील. अभिनेत्रीने तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यतील खाजगी गोष्टींबद्दल भाष्य केलं होतं, ज्यामधून आलियाचं जर्मनीशी खास नातं असल्याचं समोर आलं.
आलियाची आई अभिनेत्री सोनी राजदान ही मुळची जर्मनीची आहे. तर सोनी यांचे आजोबा त्याकाळी जर्मनीत घडणाऱ्या सामाजिक गोष्टींवर अनेकदा भाष्य करायचे. त्यामुळे त्यांनी एकदा हिटलर विरोधात वृत्तांत छापलं असल्याचंही म्हटलं जातं. आलियाच्या पणजोबांना हिटलर विरोधात वृत्तांत छापणं पडलं होतं महागात. नाजी गव्हर्मेंटने त्यांना तुरुंगात पाठवलं होतं. परंतु जर्मन असल्याने त्यांची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर मात्र त्यांना देशातून बाहेर काढण्यात आलं.
advertisement
जर्मनीमधून निघून जायला सांगितल्यानंतर आलियाच्या आजीचं कुटुंब आधी चेकोस्लोवाकिया येथे गेलं आणि त्यानंतर ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. इंग्लंडमध्येच आलियाची आई सोनी राजदान यांचा जन्म झाला. बर्लिनमधील फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'हायवे' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान आलियाने तेथील माध्यमांसह संवाद साधताना याबद्दल भाष्य केलं होतं.
advertisement
दरम्यान आलिया नुकतीच 'जिगरा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. आलियाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर आलिया 'अल्फा' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याचसह लवकरच ती प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2025 11:11 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Alia Bhatt : जर्मनीत पुर्वज, हिटलरसोबत खास नातं, आलिया भट्टला कशी मिळाली ब्रिटिश नागरिकता?








