मुंबईतील मार्गाला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं नाव, मुलगा म्हणाला, 'हा स्वप्नपूर्तीचा क्षण'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
मुंबईतील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. नुकताच या संबंधिचा कार्यक्रम पार पडला आहे.
मुंबई: तब्बल सहा दशके मराठीसह हिंदी मनोरंजन विश्व गाजवलेले अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व रमेश देव यांची ९६ वी जयंती ३० जानेवारीला पार पडली. रमेश देव यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना खास आदरांजली देण्यात आली आहे. अंधेरी येथील वर्सोवा परिसरातील एका रस्त्याचे ‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. नुकताच या संबंधिचा कार्यक्रम पार पडला आहे.
रमेश देव यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांचं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. अशा या महान कलाकाराला आदरांजली देण्यासाठी आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘मराठी चित्रपट कट्टा’ चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
advertisement
याप्रसंगी बोलताना रमेश देव यांचे पुत्र अभिनेते अजिंक्य देव म्हणाले, ‘आज संपूर्ण देव कुटुंबियांसाठी हा स्वप्नपूर्तीचा आणि आनंदाचा दिवस आहे. आज बाबांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. बाबांच्या नावाचा मार्ग झाला याचा खूप आनंद झाला आहे. हे बाबांचे आशीर्वाद आहेत. याचा त्यांना ही निश्चितच आनंद झाला असेल.' याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ गायिका वैशाली सामंत, दिव्या खोसला कुमार, कांचन घाणेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2025 10:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मुंबईतील मार्गाला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं नाव, मुलगा म्हणाला, 'हा स्वप्नपूर्तीचा क्षण'







