सकाळच्या गर्दीत मुंबईकरांचे हाल
मिळालेल्या माहितीनुसार, ही मेट्रो सकाळी 10 वाजून 48 मिनिटांनी गुंदवली स्थानकावर येणे अपेक्षित होते. मात्र ती 10 वाजून 50 मिनिटांनी स्थानकात दाखल झाली. त्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो पुढे जाऊ शकली नाही आणि ती स्थानकावरच थांबून राहिली.
गाडी बराच वेळ थांबल्यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले. काही प्रवाशांनी परिस्थितीबाबत विचारणा केली. प्रशासनाने तत्काळ कारवाई करत प्रवाशांना सुरक्षितपणे मेट्रोमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानकावर सुरक्षा कर्मचारी आणि तांत्रिक पथक तैनात करण्यात आले आहे.
advertisement
या घटनेमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
