या शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात दाखल झाले आहेत. येथे त्यांनी सिद्धीविनायकाचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले आहे. या संबंधित फोटोही समोर आले आहेत.
advertisement
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यानंरत आता देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या मंदिराकडे निघाले आहेत. येथे देखील त्यांनी मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे. यावेळी देखील त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांना शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. पण या सोहळ्याला हे तीनही नेते उपस्थित राहणार नाही आहेत.
दरम्यान या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या दोन बड्या नेत्यांसह भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
आझाद मैदानावर आज फक्त तीन नेत्यांचाच शपथविधी पार पडणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.
