अमरावतीमधील शेतकऱ्याचा प्रयोग, घरच्या घरी तयार केले कीटकनाशक, असा होतो शेतीला फायदा
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अमरावतीमधील शेतकऱ्याने नवीन प्रयोग करून बघितला. त्यामुळे त्यांना आता शेतीसाठी अनेक फायदे होत आहे.
advertisement
1/7

अमरावतीमधील अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी गेल्या काही वर्षांत सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा त्यांनी एक नवीन प्रयोग करून बघितला. त्यांनी शेतात कीटकनाशक म्हणून वापरण्यासाठी पंचामृत तयार केले आहे.
advertisement
2/7
त्यात पाच घटक वापरून तयार केल्याने त्याला पंचामृत असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पिकांवर किडीचा परिणाम होत नाही. त्याचबरोबर जंगली प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण होते, असे रविंद्र सांगतात.
advertisement
3/7
शेतकरी रविंद्र मेटकर यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, सध्या प्रधानमंत्र्यांचा कल विषमुक्त अन्न आणि सेंद्रिय शेती वाढवण्याकडे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहे. मी गेले 5 ते 6 वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहे. त्यात मी एक प्रयोग करून बघितला. त्याला पंच्यामृत असे नाव दिले.
advertisement
4/7
शेतात कीटक आणि जंगली प्राणी जास्त जोर करतात. त्याला आळा घालण्यासाठी ताक, अंडी, चुना, तुरटी आणि गूळ हे पदार्थ प्रमाणात घेऊन एकत्र करून त्याचे मिश्रण तयार केले. ते मिश्रण एका ड्रामात मशीनने फिरवून घेतले. ते योग्य प्रमाणात घेऊन त्याची सर्व पिकांवर फवारणी केली. पिकांवर 4 फवारणी केल्यास त्याचा नक्की फायदा होतो.
advertisement
5/7
20 अंडी, 2 लिटर ताक, 100 ग्राम गुळ, 100 ग्राम चुना, 200 ग्राम तुरटी हे सर्व साहित्य 21 दिवस मिक्स करून ठेवायचं. त्यानंतर फवारणी करताना 500 मिली मिश्रण 20 लिटर पाण्यात टाकून त्याचा एक पंप औषध तयार होते. 1 एकर शेतीसाठी 80 लिटर पाणी वापरावे लागेल, असे याचे प्रमाण आहे.
advertisement
6/7
यापासून होणारे फायदे 1. शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. 2. जंगली जनावरांपासून संरक्षण होते. 3. पूर्णतः सेंद्रिय शेती करण्यास मदत होते. 4. कमीत कमी खर्चात पिकाची व्यवस्थित देखरेख होते.
advertisement
7/7
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे मिश्रण आपल्या शेतात वापरले तर विषमुक्त शेती करण्यास मदत होईल. कमीत कमी खर्चात उपयुक्त असा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता, असे रविंद्र सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
अमरावतीमधील शेतकऱ्याचा प्रयोग, घरच्या घरी तयार केले कीटकनाशक, असा होतो शेतीला फायदा