TRENDING:

जया एकादशीला 'या' गोष्टी बॅन, तुम्हीही टाळा 6 चुका; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान!

Last Updated:
हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशीला 'जया एकादशी' असे म्हटले जाते. हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून, यामुळे व्यक्तीला पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
advertisement
1/7
जया एकादशीला 'या' गोष्टी बॅन, तुम्हीही टाळा चुका; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान
हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशीला 'जया एकादशी' असे म्हटले जाते. हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून, यामुळे व्यक्तीला पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. मात्र, एकादशीचे व्रत करताना काही नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. जर अजाणतेपणीही काही चुका झाल्या, तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही आणि दोष लागू शकतो.
advertisement
2/7
तांदळाचे सेवन: एकादशीला तांदूळ खाणे हे सर्वात मोठे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी तांदळात 'काम' वास करतो. जो व्यक्ती या दिवशी भात खातो, त्याला पुढील जन्मी सरपटणाऱ्या प्राण्याचा योनी प्राप्त होतो, असे मानले जाते.
advertisement
3/7
तुळशीला स्पर्श किंवा पाने तोडणे: तुळशी माता भगवान विष्णूंची परम भक्त आहे. ती एकादशीला विष्णूंसाठी निर्जला उपवास करते. त्यामुळे या दिवशी तुळशीची पाने तोडणे किंवा तिला स्पर्श करणे महापाप मानले जाते. पूजेसाठी आदल्या दिवशीच पाने तोडून ठेवावीत.
advertisement
4/7
मीठ आणि तामसिक अन्नाचा वापर: एकादशीच्या दिवशी उपवासात पांढऱ्या मिठाचा वापर करू नये. तसेच लसूण, कांदा, हिंग किंवा मोहरी यांसारख्या तामसिक पदार्थांचा वापर जेवणात किंवा फोडणीत करू नये. केवळ 'सेंधव मिठाचा' वापर करावा.
advertisement
5/7
दात घासणे आणि क्षौरकर्म: शास्त्रात एकादशीला दात घासण्यासाठी टूथपेस्ट किंवा दातवण वापरण्यास मनाई केली आहे. तसेच या दिवशी केस कापणे, नखे काढणे किंवा दाढी करणे या गोष्टी अशुभ मानल्या जातात.
advertisement
6/7
दिवसा झोपणे: एकादशीचा दिवस हा 'जागरणाचा' आणि 'नामस्मरणाचा' असतो. या दिवशी दुपारी झोपल्याने व्रताचे पुण्य नष्ट होते. केवळ आजारी व्यक्ती किंवा वृद्ध लोकांसाठी यात सवलत दिली जाते.
advertisement
7/7
कोणाचीही निंदा किंवा राग करणे: व्रताच्या दिवशी केवळ अन्नाचा त्याग करून चालत नाही, तर मनावरही ताबा असावा लागतो. या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलणे, खोटे बोलणे किंवा रागावणे यामुळे मानसिक पवित्रता भंग पावते आणि उपवास निष्फळ ठरतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
जया एकादशीला 'या' गोष्टी बॅन, तुम्हीही टाळा 6 चुका; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल