Aajache Rashibhavishya: पैसा येणार, कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळणार, ‘या’ राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Aajache Rashibhavishya : आज काही राशीवर महादेवाची विशेष कृपादृष्टी असणार आहे. ज्योतिषी अशोक पाटील यांनी मेष ते मीन राशींचं राशीभविष्य सांगितलं आहे.
advertisement
1/13

मेष राशीच्या लोकसाठी आजचा दिवस चांगला जाणार असून अनेक चांगल्या घटना आज तुमच्यासोबत होतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन जबाबदारी येऊ शकते. पैसे जास्त खर्च कराल त्यामुळे खरेदीवर नियंत्रण ठेवा.
advertisement
2/13
वृषभ राशींचा आजचा दिवस महादेवाच्या कृपेने उत्तम जाणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होणार आहेत. ज्याची तुम्ही वाट पाहत होता. कामामध्ये काही बदल केले जाऊ शकतात परंतु ते तुमच्या फायद्याचे असतील. सहकार्यसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम ठेवणं आवश्यक आहे.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळेल. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे तुमच्याकडे येतील त्यामुळे आर्थिक कष्टातून काहीसा दिलासा मिळेल. कामात यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत.
advertisement
4/13
कर्क राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी डेडलाईन पूर्ण कराव्या लागतील. कुटुंबातील विशेष शुभ कार्याला हजेरी लावावी लागू शकते .आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
5/13
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काही गोष्टी अचानक बदलू शकतात, त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. काही लोक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही शांत राहून कामावर लक्ष दिलं तर परिस्थिती तुमच्या बाजूने राहील.
advertisement
6/13
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक जाणार आहे. नातेसंबंधात असलेला ताण कमी होईल आणि जवळच्या व्यक्तीसोबत संवाद वाढेल. कामाच्या ठिकाणीही सहकाऱ्यांची मदत मिळेल, त्यामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. आज तुमच्या कामाची दखल घेतली जाईल .
advertisement
7/13
तुळा राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाजूने उत्तम असणार आहे. मिळकतीचे मार्ग वाढण्याची शक्यता आहे. कामाची धावपळ असेल त्यामुळे आरोग्यम धन संपदा ही बाब लक्षात ठेवा. नवीन गोष्टींची सुरुवात कराल .कुटुंबाला वेळ द्या.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. अचानक जवळच्या व्यक्तीची भेट होईल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे परंतु तज्ञांचा सल्ला महत्वाचा आहे.
advertisement
9/13
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साह वाढवणारा ठरेल. कामात नवनवीन कल्पना सुचतील आणि काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची संधी मिळेल. ऑफिस किंवा व्यवसायात पुढे जाण्यासाठी योग्य वातावरण मिळेल. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, कारण लवकरबाजीमुळे अडचण निर्माण होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.
advertisement
10/13
मकर राशीसाठी आजचा दिवस उत्तम योग घेऊन येतं आहे. आजच्या दिवशी एखादी नवी सुरुवात फायद्याची ठरू शकते. व्यवसायाच्या ठिकाणी काही बदल करावे लागू शकतात. जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन पर्याय समोर येतील. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक व्यवहार करताना जपून राहा, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. योग्य विचार करून पाऊल टाकल्यास पुढे प्रगतीचे मार्ग खुले होतील.
advertisement
12/13
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुम्ही एकाग्रतेने काम केलं तर सगळं व्यवस्थित होईल. काही गोष्टी मनात चालू राहतील, त्यामुळे अनावश्यक विचार टाळा. आज धार्मिक किंवा अध्यात्मिक गोष्टींकडे मन वळेल. घरातही वातावरण ठीक राहील.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: पैसा येणार, कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळणार, ‘या’ राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य