TRENDING:

लठ्ठपणालाच बनवलं 'खास', हिरोईनींची मैत्रीण बनून चमकली! बॉलीवूडची 'कॉमेडी क्वीन' गुड्डी; ती सध्या काय करतेय?

Last Updated:
Actress Guddi Maruti : बॉलिवूडमध्ये फक्त हिरो-हिरोईन नाही तर सहकलाकारही त्यांच्या खास शैलीमुळे लक्षात राहतात. त्यापैकी एक म्हणजे गुड्डी मारुती. लठ्ठ शरीर आणि अप्रतिम विनोदी टायमिंगने तिने कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
advertisement
1/9
लठ्ठपणालाच बनवलं 'खास', हिरोईनींची मैत्रीण बनून चमकली! बॉलीवूडची 'कॉमेडी क्वीन' गुड्डी; ती सध्या काय करतेय?
बॉलीवूडची कॉमेडी क्वीन गुड्डी... गुड्डी मारूती तुमच्या लक्षात असेल. शरीराने लठ्ठ असलेली ही अभिनेत्री पण आपल्या लठ्ठपणाला तिने आली कमजोरी बनू दिलं नाही तर त्यालाच तिने आपली ताकद बनवलं आणि पडद्यावर एक अनोखी ओळख निर्माण केली.
advertisement
2/9
4 एप्रिल 1961 रोजी मुंबईत जन्मलेली गुड्डी. जिचं खरं नाव ताहिरा परब आहे. तिचे वडील मारूतीराव परबही एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. कुटुंबातच फिल्मी बॅकग्राऊंड असल्याने गुड्डीला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीची आवड होती. 
advertisement
3/9
तिने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून फिल्ममध्ये अभिनय करायला सुरुवात केली. जान हाजिर है या फिल्ममध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं. 
advertisement
4/9
नंतर वडीलांचं अचानक निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी चिमुकल्या गुड्डीच्या खांद्यावर आली. कठीण काळातही ती खचली नाही. तिने आपल्या अभिनयालाच आपला आधार बनवायचं ठरवलं. पण अभिनयाचा हा मार्ग तिच्यासाठी सोपा नव्हता. कारण त्या काळात बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या सुडौल आणि आकर्षक शरीरयष्टीला महत्त्व दिलं जात होतं. त्यामुळे लठ्ठपणा गुड्डीसाठी अडथळा ठरत होता. तरी तिने हार मानली नाही.
advertisement
5/9
गुड्डीने आपल्या शारीरिक रूपाचा विनोदी शस्त्र म्हणून वापर केला. तिने छोट्या भूमिका केल्या. त्यानंतर कित्येक फिल्ममध्ये ती मुख्य हिरोईन्सची मैत्रीणही बनली आहे. तिचा विनोदी अभिनय इतका लोकप्रिय झाला की तिला 'टुनटुन' या नावानेही ओळखलं जाऊ लागलं. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मनमोहन देसाई यांनी तिला गुड्डी मारुती हे नाव दिले, ज्यामुळे ती संपूर्ण बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली.
advertisement
6/9
गुड्डी मारुतीने तिच्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. 'दुल्हे राजा', 'बीवी नं. 1', 'शोला और शबनम' आणि 'चोर मचाए शोर' यासारख्या फिल्ममध्ये तिने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केले. तिची विनोदी टायमिंग आणि नैसर्गिक शैली अनेकदा प्रेक्षकांना हसवत असे.
advertisement
7/9
1995 च्या 'सॉरी मेरी लॉरी' या चित्रपटानंतर गुड्डी मारुतीने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. जवळपास नऊ वर्षांनंतर 2015 मध्ये तिने 'हम सब उल्लू हैं' या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
advertisement
8/9
त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिने 'मिसेस कौशिक की पाच बहुएं', 'डॉली की अरमानों की' आणि 'ये उन दिनों की बात है' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. तिने टीव्हीवर गंभीर भूमिकाही साकारल्या. पण प्रेक्षकांना तिला हलक्याफुलक्या विनोदी भूमिकेत पाहणं अधिक आवडलं.
advertisement
9/9
टीव्हीवर काम केल्यानंतर गुड्डीने तिचं वजन लक्षणीयरित्या कमीही केलं. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत म्हणायचं तर तिने बिझनेसमन अशोक यांच्याशी झालं आहे. ते मुंबईतील वांद्रे परिसरात राहतात. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लठ्ठपणालाच बनवलं 'खास', हिरोईनींची मैत्रीण बनून चमकली! बॉलीवूडची 'कॉमेडी क्वीन' गुड्डी; ती सध्या काय करतेय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल