TRENDING:

Holi 2026: शिमग्याला राहु-केतुसहित 4 ग्रह वक्री..! तरीपण 3 राशीच्या लोकांना लक साथ देणार, धनलाभाचे योग पुन्हा

Last Updated:
Holi 2026: यंदा शिमगा म्हणजेच होळीचा सण 4 मार्चला साजरा केला जाणार आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, होळीच्या दिवशी ग्रहांची एक विशेष स्थिती दुर्मिळ योगायोग घडवून आणत आहे. हिंदू पंचांगानुसार, होळीच्या वेळी चार ग्रह वक्री म्हणजेच उलट्या चालीने चालणार आहेत.
advertisement
1/6
शिमग्याला राहु-केतुसहित 4 ग्रह वक्री..! तरीपण 3 राशीच्या लोकांना लक साथ देणार
राहू आणि केतू व्यतिरिक्त सध्या गुरू ग्रह वक्री अवस्थेत आहेत, तर 26 फेब्रुवारीपासून बुध ग्रहाची उलट चाल सुद्धा सुरू होणार आहे. होळीच्या दिवशी या चार मोठ्या ग्रहांची वक्री चाल तीन राशीच्या लोकांसाठी भाग्याची ठरणार आहे. 
advertisement
2/6
मिथुन - वक्री ग्रहांची स्थिती मिथुन राशीच्या लोकांसाठी नशिबाची दारे उघडणारी ठरेल. तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि सकारात्मक बदल होणार आहेत. प्रभावशाली लोकांशी तुमचा संपर्क येईल. जास्तीत जास्त धनलाभ मिळवण्याच्या जिद्दीने तुम्ही पुढे जाल. अहंकार आणि भेदाभेद यांपासून लांब राहणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
advertisement
3/6
मिथुन - कर्जाच्या ज्या समस्येने तुम्हाला दीर्घकाळ त्रास दिला होता, ती आता दूर होणार आहे. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. जोडीदारासाठी तुम्ही एखादी महागडी भेटवस्तू खरेदी करू शकता. मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याबद्दल महत्त्वाच्या योजना आखाल.
advertisement
4/6
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील. प्रत्येक आघाडीवर गोष्टी तुमच्या बाजूने असतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमच्या स्वभावातील बदलामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
advertisement
5/6
तूळ राशीच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होऊ शकते. सरकारी कामे जी तुमच्या चिंतेचा विषय बनली होती, ती या काळात नक्कीच पूर्ण होतील. ज्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता, ती आता तुम्हाला मिळतील.
advertisement
6/6
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी ही वेळ लोकांमध्ये मिसळण्याची आहे. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली ओळख तुमच्या करिअरसाठी भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यवसायात जनसंपर्क आणि जाहिरातीमुळे चांगला नफा मिळेल. तुमच्या आर्थिक योजना यशस्वी होतील आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. सर्जनशील कामांमध्ये तुमची रुची वाढेल, ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुमच्यामध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Holi 2026: शिमग्याला राहु-केतुसहित 4 ग्रह वक्री..! तरीपण 3 राशीच्या लोकांना लक साथ देणार, धनलाभाचे योग पुन्हा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल