Numerology: फार चांगलं जमण्याची अपेक्षा सोडा! या जन्मतारखांच्या जोडप्यांनी समजुतीनं करावा संसार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi : क्रमांक 4 चा स्वामी राहू हा उग्र ग्रह आहे तर क्रमांक 1 चा संबंध सूर्य अर्थात रविशी दूरच्या नातेवाईकासारखा असतो. त्यामुळे संवाद खूप कमी असतो. क्रमांक 1 आणि 4 चे संबंध कसे असतात ते जाणून घेऊया.
advertisement
1/6

या दोन्ही अंकांमध्ये स्वतंत्र वृत्ती आणि अहंकारीपणा असतो, त्यामुळे बऱ्याचदा संघर्ष निर्माण होतो.
advertisement
2/6
क्रमांक 1 आणि क्रमांक 4, अशा दोघांनाही एकत्र निर्णय घेणं किंवा त्यांचं एकमत होणं अवघड असतं. त्यामुळे व्यावसायिक भागीदारांनी कागदोपत्री भागीदार होणं टाळावं.
advertisement
3/6
विवाहित जोडप्यांना एकमेकांचे सहकार्य आणि पाठबळ मिळाले तरच ते त्या आधारे असे आव्हानात्मक जीवन जगू शकतात.
advertisement
4/6
या क्रमांकाच्या व्यक्तींनी मालमत्ता आणि धातूशी संबंधित व्यवसाय केला तर त्यांना फायदा होतो. त्यामुळे त्यांनी अशा व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे.
advertisement
5/6
या क्रमांकाच्या राजकीय व्यक्तींनी नियमाला अनुसरून गोष्टी केल्यास त्यांना राजकीय करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकते. शुभ रंग - पिवळा आणि राखाडी, दान - या व्यक्तींना एखाद्या आश्रमात तेल दान करावं.
advertisement
6/6
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: फार चांगलं जमण्याची अपेक्षा सोडा! या जन्मतारखांच्या जोडप्यांनी समजुतीनं करावा संसार