Gaurav More Wedding: 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर! गौरव मोरेने गुपचूप उरकलं लग्न; बायकोही आहे अभिनेत्री
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gaurav More Got Married: महाराष्ट्राचा लाडका गौरव मोरे बोहल्यावर चढला असून मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि उद्योजिका ऋतुजा बागवेनी ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
advertisement
1/10

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला 'फिल्टरपाड्याचा बच्चन' गौरव मोरेने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
advertisement
2/10
हास्यजत्रामध्ये आपल्या गर्लफ्रेंडच्या बापाकडे लग्नासाठी तिचा हात मागायला येणाऱ्या गौरवचा नेहमी पाणउतारा व्हायचा. मात्र, याच गौरव मोरेने खऱ्या आयुष्यात त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली आहे.
advertisement
3/10
महाराष्ट्राचा लाडका गौरव मोरे बोहल्यावर चढला असून मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि उद्योजिका ऋतुजा बागवेनी ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. ऋतुजाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर गौरव आणि त्याची पत्नी प्रियंकासोबतचा फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे.
advertisement
4/10
गौरवने अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोणालाही थांगपत्ता लागू न देता लग्नाची गाठ बांधली आहे. गौरवच्या या सरप्राइज लग्नामुळे त्याचे चाहते आनंदी झाले असले, तरी अनेकांना हा सुखद धक्काच बसला आहे.
advertisement
5/10
गौरवने त्याची गर्लफ्रेंड प्रियंका कारेकर हिच्यासोबत आयुष्यभराची नवी इनिंग सुरू केली आहे. विशेष म्हणजे गौरवने स्वतः अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, त्याच्या जवळच्या मैत्रिणीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा आनंदाचा गौप्यस्फोट झाला आहे.
advertisement
6/10
ऋतुजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियंकाच्या गळ्यात मंगळसूत्र, हातावर मेहंदी आणि हिरवा चुडा स्पष्ट दिसत आहे. ऋतुजाने या फोटोला “मिस्टर अँड मिसेस मोरे” असं कॅप्शन दिलं असून, दोघांच्या नवीन प्रवासासाठी आणि नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
7/10
ऋतुजाच्या या पोस्टमुळे गौरवचं लग्न झाल्याचं आता अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! 'करू' आणि 'बच्ची', गॉड ब्लेस यू."
advertisement
8/10
गौरवने केवळ लग्नच केलं नाही, तर आपल्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेशही केला आहे. एकाच वेळी दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळाल्याने गौरववर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
9/10
दरम्यान, गौरव मोरेची पत्नी प्रियंकाही मनोरंजन विश्वात सक्रिय असल्याचं तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर दिसत असून तिने काही नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
advertisement
10/10
इतकंच नाही, तर अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि प्रियंका या जुन्या मैत्रिणी आहे. तब्बल १० वर्षांहून अधिक काळ त्यांनी ही मैत्री जपली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gaurav More Wedding: 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर! गौरव मोरेने गुपचूप उरकलं लग्न; बायकोही आहे अभिनेत्री