TRENDING:

IPL 2026 : मुंबईला प्ले-ऑफचा 'अलार्मिंग अलर्ट', पहिल्याच आठवड्यात पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ!

Last Updated:
आयपीएल 2026 चा पहिला आठवडा संपला आहे. पहिल्या आठवड्यातल्या 11 सामन्यांनंतर 10 पैकी 7 टीमनी किमान एक-एक सामना जिंकला आहे, तर उरलेल्या 3 टीम अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.
advertisement
1/11
मुंबईला प्ले-ऑफचा 'अलार्मिंग अलर्ट', पहिल्याच आठवड्यात पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ!
आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातल्या जवळपास प्रत्येक सामन्यांमध्ये कांटे की टक्कर पाहायाला मिळाली आहे, त्यामुळे प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी प्रत्येक टीमला झगडावं लागणार आहे.
advertisement
2/11
आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या 11 सामन्यांच्या निकालानंतर काही टीमना नेट रनरेटवरही प्ले-ऑफमध्ये जावं लागू शकतं, त्यामुळे प्रत्येक टीमला पराभव होत असला तरी पराभवाचा फरक कमी करावा लागणार आहे.
advertisement
3/11
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्या गतविजेती आरसीबी पहिल्या क्रमांकावर आहे. आरसीबीने त्यांचे 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. आरसीबीचा नेट रनरेटही सर्वाधिक +2.501 आहे.
advertisement
4/11
2 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवणारी राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. 4 पॉईंट्ससह राजस्थानचा नेट रनरेट +2.233 एवढा आहे. राजस्थानने चेन्नई आणि गुजरातचा पराभव केला आहे.
advertisement
5/11
राजस्थानप्रमाणेच दिल्ली कॅपिटल्सनेही 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत, पण दिल्लीचा नेट रनरेट +1.170 आहे, त्यामुळे दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीने लखनऊ आणि मुंबईचा पराभव केला आहे.
advertisement
6/11
पंजाब किंग्सने त्यांच्या 2 सामन्यांमध्ये गुजरात आणि चेन्नईला धूळ चारली. +0.637 नेट रनरेट असल्यामुळे पंजाब पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
advertisement
7/11
सनरायजर्स हैदराबादने 3 पैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे. आरसीबी आणि लखनऊविरुद्ध हैदराबादचा पराभव झाला तर केकेआरविरुद्ध त्यांनी विजय मिळवला. 2 पॉईंट्स आणि +0.275 नेट रनरेटसह हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आहे.
advertisement
8/11
मुंबई इंडियन्सने 2 पैकी एका सामन्यात विजय मिळवला आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. केकेआरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मुंबईला दिल्लीविरुद्ध पराभवाचा धक्का बसला.
advertisement
9/11
दिल्लीविरुद्ध मोठा पराभव झाल्यामुळे मुंबईचा नेट रनरेट हा मायनसमध्ये आहे. -0.206 नेट रनरेट असल्यामुळे मुंबईला पुढच्या सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी सुधारावी लागणार आहे. मुंबईची टीम सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
advertisement
10/11
मुंबईप्रमाणेच लखनऊचाही 2 पैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला. पण लखनऊचा नेट रनरेट हा मुंबईपेक्षा खराब आहे. -0.542 नेट रनरेट असल्यामुळे लखनऊ सातव्या क्रमांकावर आहे. लखनऊचा दिल्लीविरुद्ध पराभव झाल्यानंतर त्यांनी हैदराबादवर विजय मिळवला.
advertisement
11/11
गुजरात, केकेआर आणि चेन्नई यांचा एकाही सामन्यात विजय झालेला नाही, त्यामुळे या टीम पॉईंट्स टेबलमध्ये तळाला आहेत. गुजरातचा नेट रनरेट -0.424, केकेआरचा नेट रनरेट -1.964 आणि सीएसकेचा नेट रनरेट -2.517 आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुंबईला प्ले-ऑफचा 'अलार्मिंग अलर्ट', पहिल्याच आठवड्यात पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल