IPL 2026 : CSK च्या पराभवाची हॅट्रिक, 5 चुकांमुळे तिसऱ्या सामन्यातच आयपीएलमधून पॅकअप व्हायची भीती!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या पराभवासह चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रीक साधली आहे. तसेच चेन्नईचे या हंगामातलं हे पॅकअप वाटतंय. या पॅकअपला कारणीभूत चूका काय आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/10

आयपीएलमध्ये आज रॉयल चँलेंजर्स बंगळरूने चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव केला आहे. या विजयाचा शिल्पकार टीम डेविड ठरला आहे.
advertisement
2/10
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 250 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज 207 च धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव झाला होता.
advertisement
3/10
या पराभवासह चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रीक साधली आहे. तसेच चेन्नईचे या हंगामातलं हे पॅकअप वाटतंय. या पॅकअपला कारणीभूत चूका काय आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/10
चेन्नई सुपर किंग्जची बॅटीग लाईनअप पहिल्याच सामन्यात ढेपाळली होती.त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी फलंदाजीतला दमखम दाखवत 200 केल्या तरी तो सामना हारला होता.त्यानंतर आजच्या सामन्यातही त्यांची बॅटींग लाईन फ्लॉप ठरली.
advertisement
5/10
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी देखील प्रचंड खराब आहे. पहिल्या सामन्यात त्यांना राजस्थानला 128 धावात रोखला आलं नाही. तर दुसऱ्या सामन्यात 200 धावा करून सुद्धा त्यांना आरसीबीला ऑल आऊट करता आलं नाही. आजच्या आरसीबी विरूद्ध सामन्यात देखील चेन्नईच्या गोलंदाजांसमोर 250 धावा झाल्या.त्यामुळे एकंदरीत चेन्नईची गोलंदाजी प्रचंड खराब आहे.
advertisement
6/10
कॅप्टन म्हणून ऋतुराज गायकवाड देखील कमी पडताना दिसतो. तो फलंदाजीतही फारसा चमत्कार करत नाही.त्यासोबत त्याच्या कॅप्टन्सी कुठलीच रणनिती दिसत नाही आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज सलग तिसरा सामना हारली आहे.
advertisement
7/10
चेन्नई सुपर किंग्जचा लिलाव देखील फसल्यासारखं वाटतं आहे. कारण त्यांनी संपूर्ण झेन्जी टीम बनवली आहे.त्यामुळे सामन्यात व्यवस्थित कॉम्बिनेशन बसलं नाही आहे.
advertisement
8/10
चेन्नई सुपर किंग्जने ट्रेड विंडो द्वारे संजू सॅमसनला ताफ्यात घेतलं होतं. पण संजू सॅमसन राजस्थान विरूद्द 6, पंजाब विरूद्ध 7 आणि आजच्या आरसीबी विरूद्ध 9 धावा करून बाद झाला.त्यामुळे ज्या संजूने टी 20 वर्ल्ड कप फायनल गाजवलेली तो आयपीएलमध्ये पुर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
advertisement
9/10
आयपीएलमध्ये आता तीनही सामने चेन्नईने गमावल्याने त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण अवघड होणार आहे. कारण तीन सामने गमावल्याने आता चेन्नईला 11 पैकी 8 सामने जिंकाले लागणार आहे. खरं तर 7 सामने जिंकूनही चालेल पण त्यांचा नेटरनरेट खराब आहे. तो सुधारण्यासाठी त्यांना 8 सामने जिंकावे लागणार आहे.
advertisement
10/10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर टीम डेविडने 70 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्यासोबत देवदत्त पड्डीकलच्या 50 आणि रजत पाटीदारच्या 48, फिल सॉल्टने 46 धावा या बळावर आरसीबीने 250 धावा ठोकल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : CSK च्या पराभवाची हॅट्रिक, 5 चुकांमुळे तिसऱ्या सामन्यातच आयपीएलमधून पॅकअप व्हायची भीती!