Diwali Horoscope: आनंदाला बहर! दिवाळीपूर्वीच ग्रहांचा राजकुमार या 4 राशींना खुश करणार, कष्टाचं चीज
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Diwali Horoscope: दिवाळी हा सुख, समृद्धी आणि भरभराट करणारा सण मानला जातो. यंदा दिवाळीच्या दिवसात एक अनोखा योग आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक काळाने प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो हे आपण जाणतोच. त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. राशिपरिवर्तनाचा कुणावर चांगला परिणाम होतो तर कुणावर वाईट. यंदा दिवाळीच्या आधी ग्रहांतला राजपुत्र समजला जाणारा एक ग्रह राशिपरिवर्तन करणार आहे. त्याबाबत जाणून घेऊया.
advertisement
1/6

यंदा दिवाळीपूर्वी म्हणजे 29 ऑक्टोबरला बुध हा वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सुखसुविधा आणि भरभराटींचा स्रोत मानला जाणारा शुक्र विराजमान आहे. बुधाच्या संक्रमणानंतर दोन्ही ग्रह मिळून लक्ष्मीनारायण योग जुळवून आणणार आहेत. बुध आणि शुक्राच्या युतीचा चार राशींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या चार राशी कोणत्या हे जाणून घेऊया.
advertisement
2/6
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा लक्ष्मीनारायण योग अत्यंत शुभ आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत फरक पडेल. अडलेली कामं मार्गी लागतील. समाजात मानसन्मान मिळेल. तुमचे पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांना या दिवाळीतील ग्रहस्थितीमुळे आर्थिक फायदा होणार आहे. नोकरदारांचे पगार वाढतील. पदोन्नतीचा योग येईल. दाम्पत्य जीवनातील ताणतणाव संपुष्टात येतील. कौटुंबिक नातेसंबंध दृढ होतील.
advertisement
4/6
बुध शुक्र युतीमुळे कुंभ राशीच्या लोकांसाठीही ग्रहमान अनुकूल होणार आहे. नोकरीत अडचणी असतील तर त्या दूर होतील. जे लोक नोकरी शोधत असतील त्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते. परदेशगमनाचे योग येऊ शकतात. करिअरच्या नव्या संधीही मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
मीन राशीच्या व्यक्तींच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. प्रगतीचे योग आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचं चीज होईल. नोकरदारांना प्रमोशन मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं पाठबळ मिळेल.
advertisement
6/6
ग्रहदशा आपल्या आयुष्यावर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम घडवत असते. त्यामुळे ग्रहांनी स्थान बदललं की त्याचे बरेवाईट परिणाम काही विशिष्ट राशीतील व्यक्तींना जाणवतात. बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. त्याच्या संक्रमणामुळे वृश्चिक, मिथुन, कुंभ आणि मीन या राशींच्या व्यक्तींसाठी ही दिवाळी लक्ष्मीनारायण योग घेऊन येणार हे स्पष्ट आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Diwali Horoscope: आनंदाला बहर! दिवाळीपूर्वीच ग्रहांचा राजकुमार या 4 राशींना खुश करणार, कष्टाचं चीज