ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडलं, त्यानेच केलं बरबाद; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडलेलं भयंकर, रस्त्यावर भीक मागून काढले दिवस
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी धुणी-भांडी करणाऱ्या मुलीने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं. मात्र या अभिनेत्रीच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा तिला रस्त्यावर भीक मागावी लागली.
advertisement
1/9

सिनेसृष्टीत काम करणं कित्येकांचं स्वप्न असतं. मात्र, या इंडस्ट्रीतील खरं वास्तव खूप कमी लोकांनाच माहीत असतं. असंच काहीसं एका दिग्गज अभिनेत्रीसोबत घडलं. घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी धुणी-भांडी करणाऱ्या मुलीने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं. मात्र एक काळ असा आला जेव्हा तिला रस्त्यावर भीक मागावी लागली.
advertisement
2/9
ही अभिनेत्री म्हणजे दिवंगत अभिनेत्री शशिकला. १९४० मध्ये करिअरची सुरूवात करणाऱ्या या अभिनेत्रीचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षाही धक्कादायक होतं. एका सधन कुटुंबात जन्माला येऊनही त्यांना पोट भरण्यासाठी भांडी घासण्याचं काम करावं लागलं.
advertisement
3/9
शशिकला यांचा जन्म सोलापूरच्या एका श्रीमंत घरात झाला. त्यांचे वडील सोलापूरचे मोठे व्यापारी होते. पण अचानक त्यांना व्यवसायात प्रचंड तोटा झाला. त्यांचं कुटुंब रसातळाला गेलं आणि अखेर त्यांना मुंबईत यावं लागलं.
advertisement
4/9
अवघ्या १०-१२ वर्षांच्या शशिकला यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. परिणामी त्यांना दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी घासली आणि घरकाम केलं. पण त्यांच्या सौंदर्याने त्यांना सिनेसृष्टीत आणलं आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांनी अशी काही छाप पाडली की, 'शशिकला' हे नाव घराघरात पोहोचलं.
advertisement
5/9
अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी ओ.पी. सेहगल यांच्याशी लग्न केलं. सुरूवातीला सर्वकाही चांगलं होतं, मात्र त्यांच्या पतीचा व्यवसाय बुडाला आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात खटके उडायला सुरूवात झाली. त्यांच्यातील ही भांडणं इतकी वाढू लागली की शशिकला एका अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडल्या.
advertisement
6/9
या व्यक्तीच्या प्रेमात शशिकला जणू आंधळ्या झाल्या आणि त्यांनी आपल्या दोन मुलींना आणि पतीला सोडून त्या व्यक्तीसोबत थेट परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता.
advertisement
7/9
ज्याच्यासाठी शशिकला यांनी त्यांची मुलं आणि संसार सोडला, त्यानेच शशिकला यांचा छळ करायला सुरूवात केली. मारहाण आणि मानसिक त्रासाला कंटाळून शशिकला यांनी कसंबसं पुन्हा भारत गाठलं. मात्र, आपल्या देशात परतल्यानंतर त्यांना कोणीही स्वीकारलं नाही.
advertisement
8/9
शशिकला यांच्या मुली आणि त्यांच्या पतीनं त्यांच्याशी सर्व संबंध तोडले होते. परिणामी शशिकला एकट्या पडल्या. त्यांच्याकडे ना डोक्यावर छप्पर होतं, ना हातात पैसे. एकेकाळी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्रीवर मुंबईच्या रस्त्यावर भीक मागायची वेळ आली होती.
advertisement
9/9
दरम्यान, शशिकला यांच्या या परिस्थितीत मदर तेरेसा यांनी त्यांना आधार दिला. त्यांनी शशिकला यांना आपल्या आश्रमात आश्रय दिला. सलग नऊ वर्ष शशिकला यांनी तिथे राहून लोकांची सेवा केली. अखेर ४ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडलं, त्यानेच केलं बरबाद; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडलेलं भयंकर, रस्त्यावर भीक मागून काढले दिवस