TRENDING:

तयार राहा! लवकरच सुरू होणार 'या' राशींचे सुखाचे दिवस, अचानक होणार प्रॉफिट; पण 'ही' चूक महागात पडणार

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार सावलीसारखा भासणारा आणि मोक्षाचा कारक मानला जाणारा केतू ग्रह लवकरच आपली चाल बदलणार आहे. केतू सध्या सिंह राशीत विराजमान असून, त्याने नुकताच 'मघा' नक्षत्रात प्रवेश केला आहे.
advertisement
1/7
तयार राहा! लवकरच सुरू होणार 'या' राशींचे सुखाचे दिवस, अचानक होणार प्रॉफिट; पण 'ही' चूक महागात पडणार
ज्योतिषशास्त्रानुसार सावलीसारखा भासणारा आणि मोक्षाचा कारक मानला जाणारा केतू ग्रह लवकरच आपली चाल बदलणार आहे. केतू सध्या सिंह राशीत विराजमान असून, त्याने नुकताच 'मघा' नक्षत्रात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे केतू हा स्वतः मघा नक्षत्राचा स्वामी आहे, त्यामुळे त्याची शक्ती आता कित्येक पटीने वाढली आहे.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार केतू जेव्हा स्वतःच्याच नक्षत्रात भ्रमण करतो, तेव्हा तो 'राजयोग' सामान फळे देतो. मघा नक्षत्र हे सत्ता, अधिकार आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. या संयोगामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील आणि जीवनात अचानक सकारात्मक बदल घडतील.
advertisement
3/7
धनु - आत्मविश्वासात वाढ आणि प्रगती: धनु राशीच्या जातकांसाठी केतूचे हे भ्रमण अत्यंत शुभ आहे. तुमच्या कामातील संथपणा दूर होऊन कामाला वेग येईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुमच्या कतृत्वाचा ठसा उमटवाल. अध्यात्मिक प्रवासाचे योग असून रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील.
advertisement
4/7
वृषभ - अनपेक्षित धनलाभ आणि गुंतवणूक: वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्तेचा असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. विशेषतः जुन्या गुंतवणुकीतून, ज्यातून तुम्हाला आशा नव्हती, तिथून मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण राहिल्यामुळे तुमची बचत वाढेल.
advertisement
5/7
सिंह - वर्चस्व आणि सामाजिक प्रतिष्ठा: केतू तुमच्याच राशीत असून मघा नक्षत्रात आल्यामुळे तुमची समाजातील प्रतिमा सुधारेल. शत्रूंवर तुम्ही सहज विजय मिळवाल. कौटुंबिक वादातून तुमची सुटका होईल आणि मान-सन्मान वाढेल. मात्र, घाईत निर्णय घेणे टाळावे लागेल.
advertisement
6/7
केतू हा 'मायावी' ग्रह असल्याने तो अचानक फळ देतो. या काळात या 3 राशींच्या जातकांना अनपेक्षितपणे एखादी मोठी संधी किंवा लॉटरी लागू शकते. तसेच, ज्योतिषी, संशोधक आणि गुप्तहेर क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष प्रसिद्धी मिळेल.
advertisement
7/7
ज्या जातकांच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून संघर्षाचा काळ सुरू होता, त्यांच्यासाठी आता 'अच्छे दिन' सुरू होणार आहेत. केतूची ही स्थिती तुम्हाला मानसिक बळ देईल आणि भविष्यातील नियोजनासाठी योग्य दिशा दाखवेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
तयार राहा! लवकरच सुरू होणार 'या' राशींचे सुखाचे दिवस, अचानक होणार प्रॉफिट; पण 'ही' चूक महागात पडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल