TRENDING:

Sonakshi Sinha : लवकरच आजी...! लग्नानंतर 2 वर्षांनी सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? आई पूनमनेच सगळं सांगितलं

Last Updated:
Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नन्सीची चर्चा तिच्या लग्नानंतर काही दिवसांनीच सुरू झाली आता झहीर इक्बालशी तिच्या लग्नाला 2 वर्षे होतील आणि याचदरम्यान तिची आई पूनमने तिच्या प्रेग्नन्सीबाबत सांगितलं आहे.
advertisement
1/9
लवकरच आजी...! लग्नानंतर 2 वर्षांनी सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? आई पूनमनेच सगळं सांगितलं
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चा तिच्या लग्नानंतर काही दिवसांतच सुरू झाली. ती वेगळ्याच कारणासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती, इथूनच तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना सुरुवात झाली. यानंतर तिचे सोशल मीडियावर असे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यात ती अशा पोझमध्ये असते की प्रेग्नंट असल्यासारखीच वाटते. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं.
advertisement
2/9
सोनाक्षीने एका इव्हेंटमध्ये ड्रेस घातला तेव्हा ती आपला बेबी बम्प लपवत असल्याची चर्चा झाली. त्यानंतर झहीरनेही या अफवांवर विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया दिली. एकदा त्याने पापाराझींसमोर सोनाक्षीच्या पोटावर हात ठेवत पोझ दिली होती. 
advertisement
3/9
यानंतर सोनाक्षीने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत पोस्ट केली होती. "मानवी इतिहासातील सर्वात प्रदीर्घ प्रेग्नन्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड 16 महिने. अजूनही सुरूच...", असं ती म्हणाली होती. तिने ही पोस्ट तिच्या प्रेग्नन्सीबाबत होत असलेल्या चर्चांबाबत केली होती.
advertisement
4/9
सोनाक्षी आणि जहीर त्यांच्या प्रेग्नन्सींच्या चर्चांना मजेशीर पद्धतीने घेतात आणि तशाच पद्धतीने प्रतिक्रिया देतात.  त्यामुळे काय खरं, काय खोटं हे बऱ्याचदा समजत नाही. अखेर आता सोनाक्षीची आई पूनम सिन्हानेच सोनाक्षीच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
5/9
'इन्स्टंट बॉलिवूड'शी बोलताना पूनम यांनी आधी त्यांची सोनाक्षी त्यांच्या आयुष्यात आल्याच्या क्षणाची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, "आमच्या घरात मुलगी आली, तो आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. मुलींशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नाही. मुली असणं खूप महत्त्वाचं आहे."
advertisement
6/9
यानंतर सोनाक्षीच्या प्रेग्नन्सीबाबत विचारलं असता आपल्याला कितीतरी वेळा आजी बनवलं असं त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितलं, "मला किती वेळा आजी बनवलं आहे. पण हो तो आनंदही मला नक्कीच मिळेल"
advertisement
7/9
सोनाक्षी आणि जहीर यांची पहिली भेट 2013 साली सलमान खानच्या पार्टीत झाली होती. 2017 साली ट्युबलाइटच्या आफ्टर पार्टीमध्ये त्यांच्यात एक खास नातं तयार झालं. तेव्हापासून ते दोघं एकमेकांना डेटिंग करत होते.
advertisement
8/9
2024 साली त्यांनी लग्न केलं. सोनाक्षीच्या मुंबईतील घरी स्पेशल मॅरेज एक्ट अंतर्गत त्यांनी सिव्हिल मॅरेज केलं. त्यांच्या लग्नाला त्यांचं कुटुंब आणि फक्त जवळचा मित्र परिवार होता. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन आयोजित केलं होतं.
advertisement
9/9
सोनाक्षी-जहीर यांच्या लग्नाला जूनमध्ये दोन वर्षे होतील. दोघंही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहेत. दोघं अनेकदा त्यांच्या आयुष्यातील मजेशीर क्षण चाहत्यांसोबत शेअर करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sonakshi Sinha : लवकरच आजी...! लग्नानंतर 2 वर्षांनी सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? आई पूनमनेच सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल