TRENDING:

Gaurav More Wife : बॉलिवूडपासून साऊथपर्यंत, गौरवपेक्षा कमी नाहीये बायको; कोण आहे 'मिसेस मोरे'?

Last Updated:
Gaurav More Wife : अभिनेता गौरव मोरे लग्नबंधनात अडकला. कोण आहे फिल्टरपाड्याच्या बच्चनची बायको? 'मिसेस मोरे' करते काय?
advertisement
1/8
 बॉलिवूडपासून साऊथपर्यंत, गौरवपेक्षा कमी नाहीये बायको; कोण आहे 'मिसेस मोरे'?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे  चर्चेत आला आहे. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरवने चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.
advertisement
2/8
विशेष म्हणजे गौरवनं स्वतः या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. गौरवच्या लग्नाची माहिती अभिनेत्री ऋतुजा बागवे हिच्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर आली. ऋतुजाने 'मिस्टर अँड मिसेस' असं कॅप्शन देत दोघांबरोबर फोटो शेअर केला. गौरव मोरेचं लग्न झाली ही माहिती समोर येताच चाहत्यांना सुखद धक्का बसला.
advertisement
3/8
आता गौरव मोरेची पत्नी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. गौरव मोरेची बायको देखील त्याच्याइतकची टॅलेंटेड आहे.  
advertisement
4/8
गौरवच्या पत्नीचं नाव प्रियांका कारेकर असं आहे. ती देखील अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे. प्रियांका ही एक गुणी अभिनेत्री असून तिने बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच तिने बॅकस्टेजवरही अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/8
प्रियांकाने आपल्या कारकिर्दीत साऊथ इंडस्ट्रीतही काम केलं आहे. विशेष म्हणजे तिने साऊथमधील लोकप्रिय अभिनेता दुलकर सलमानसोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. त्या अनुभवाबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. 
advertisement
6/8
याशिवाय प्रियांकाने हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या 'चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. तसेच तिने दिग्दर्शिका गौरी शिंदे यांच्यासोबतही काम केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
7/8
एकीकडे गौरव मोरे आपल्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर दुसरीकडे त्याची पत्नी प्रियांका कारेकरही अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. येत्या काळात मिस्टर आणि मिसेस मोरे एकत्र स्क्रिन शेअर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  
advertisement
8/8
गौरवच्या या सुखद बातमीमुळे चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गौरव मोरेनं त्याच्या नव्या घरातही गृहप्रवेश केला आहे. एकीकडे लग्न आणि दुसरीकडे नव्या घरात गृहप्रवेश करत गौरव आणि प्रियांका यांनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gaurav More Wife : बॉलिवूडपासून साऊथपर्यंत, गौरवपेक्षा कमी नाहीये बायको; कोण आहे 'मिसेस मोरे'?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल