अरे बापरे! घामाच्या धारा अन् अंगाची लाहीलाही, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेची लाट?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कितीही गार पाणी अंगावर ओता समाधान नाही होणार, इतकी उष्णता अचानक का वाढणार? एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वातावरणात अचानक बदल होणार, काय आहे कारण?
advertisement
1/5

अरे बापरे! पहिल्या आठवड्यात अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात गारपीट आणि पाऊस झाला. मुंबईसह उपनगर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. मुंबईसह उपनगरात प्रचंड उष्णता वाढली होती. आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचे चटके वाढणार आहेत.
advertisement
2/5
महाराष्ट्रात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढणार आहे. पारा 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात 40 ते 42 डिग्रीपेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, 12 ते 4 घराबाहेर कामाशिवाय पडू नये असं आवाहन केलं आहे.
advertisement
3/5
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हिटवेव सारखी स्थिती येईल असं नाही. मात्र वातावरणात सतत बदल होत राहणार आहे. 15 एप्रिलनंतर प्री मान्सूनची स्थिती कशी निर्माण होते यावरही अवलंबून असणार आहे. यावेळी मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे. तर उन्हाचे चटके जास्त बसू शकतात.
advertisement
4/5
दक्षिण भारतात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून वेस्टर्न डिस्टर्बन्स हवा येत आहेत. अरबी समुद्रातून उष्ण दमट हवा येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अति उष्णता तर काही ठिकाणी पाऊस अशी अवस्था आहे.
advertisement
5/5
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवतील मात्र अधून मधून पाऊसही राहील त्यामुळे दुपारी घामाच्या धारा आणि संध्याकाळी पाऊस असं दुहेरी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या अंदाजाबाबत देखील लवकरच IMD कडून महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. यंदा मान्सून कमी होईल असा अंदाज वर्तवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
अरे बापरे! घामाच्या धारा अन् अंगाची लाहीलाही, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेची लाट?