रंग आणि अंक बदलणार नशीब, आज मेष ते कन्या या राशींसाठी 'हा' नंबर आणि कलर ठरणार लकी!
- Published by:Manasee Dhamanskar
- Reported by:Chirag Daruwalla
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या दैनंदिन जीवनात रंग आणि अंकांना विशेष महत्त्व असते. प्रत्येक दिवसाची ग्रहस्थिती आपल्या राशीवर प्रभाव टाकत असते आणि अशा वेळी योग्य रंगाचा किंवा अंकाचा वापर केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढून कामात यश मिळण्याची शक्यता अधिक असते.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या दैनंदिन जीवनात रंग आणि अंकांना विशेष महत्त्व असते. प्रत्येक दिवसाची ग्रहस्थिती आपल्या राशीवर प्रभाव टाकत असते आणि अशा वेळी योग्य रंगाचा किंवा अंकाचा वापर केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढून कामात यश मिळण्याची शक्यता अधिक असते. आज 7 एप्रिल 2026 रोजी चंद्राचे नक्षत्रांतर आणि ग्रहांची स्थिती पाहता, मेष ते कन्या या 6 राशींच्या जातकांसाठी काही विशिष्ट नंबर आणि कलर्स अत्यंत 'लकी' ठरणार आहेत.
advertisement
2/7
मेष - काळा रंग आणि अंक 5: मेष राशीच्या जातकांसाठी आज काळा रंग संरक्षणात्मक ठरेल. हा रंग तुम्हाला नकारात्मक उर्जेपासून वाचवेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल. अंक 5 तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरू शकतो. महत्त्वाच्या निर्णयांसाठी किंवा स्वाक्षरीसाठी या अंकाचा वापर करा. मात्र, आज कोणाशीही वाद घालणे टाळावे.
advertisement
3/7
वृषभ - हिरवा रंग आणि अंक 3: वृषभ राशीसाठी आज हिरवा रंग प्रगती आणि शांततेचे प्रतीक ठरेल. या रंगाचे कपडे परिधान केल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. अंक 3 आज तुमच्यासाठी धनलाभाचे योग घेऊन येईल. व्यवसायातील नवीन करारांसाठी हा अंक अत्यंत शुभ आहे. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
advertisement
4/7
मिथुन - पिवळा रंग आणि अंक 7: मिथुन राशीचा स्वामी बुध असून आज पिवळा रंग तुमच्या बुद्धिमत्तेला धार देईल. विद्यार्थ्यांसाठी हा रंग अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करेल. अंक 7 आज तुम्हाला अनपेक्षित संधी मिळवून देऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
advertisement
5/7
कर्क - गुलाबी रंग आणि अंक 4: कर्क राशीच्या लोकांसाठी आज गुलाबी रंग नात्यांमध्ये गोडवा निर्माण करेल. जर काही कौटुंबिक तणाव असेल, तर या रंगाचा वापर केल्याने वातावरण निवळेल. अंक 4 तुम्हाला आर्थिक नियोजनात मदत करेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आजचा दिवस सावधगिरीने पावले उचलण्याचा आहे.
advertisement
6/7
सिंह - नेव्ही ब्लू आणि अंक 6: सिंह राशीच्या जातकांसाठी आज नेव्ही ब्लू रंग अधिकार आणि सन्मान मिळवून देईल. नोकरीत वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यासाठी हा रंग लकी ठरेल. अंक 6 तुमच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ करेल. प्रवासाचे योग असून रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील.
advertisement
7/7
कन्या - मरुन रंग आणि अंक 10: कन्या राशीच्या लोकांसाठी आज मरुन (लालसर तपकिरी) रंग ऊर्जेचा स्रोत ठरेल. हा रंग तुम्हाला कामातील थकवा दूर करण्यास मदत करेल. अंक 10 आज पूर्णत्वाचा अंक असून तुमच्या प्रदीर्घ काळापासून अपूर्ण असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
रंग आणि अंक बदलणार नशीब, आज मेष ते कन्या या राशींसाठी 'हा' नंबर आणि कलर ठरणार लकी!