TRENDING:

Mahashivratri 2026: तयारी महाशिवरात्रीची! महादेवाच्या पिंडीवर या 5 गोष्टींनी अभिषेक करणे शुभ, धार्मिक महत्त्व

Last Updated:
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीचा उत्सव शंभू महादेवाची भक्ती करण्यासाठी सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. हा दिवस फक्त पूजा किंवा उपवासापुरताच मर्यादित नसून, आत्मिक शांती मिळवण्यासाठी, मन स्थिर ठेवण्यासाठी आणि आयुष्यात संतुलन साधण्यासाठीची एक चांगली संधी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केलेला अभिषेक लवकर फळ देतो, असं मानलं जातं. भगवान शिव हे जलतत्त्वाशी संबंधित देव मानले जात असल्यामुळे विविध वस्तूंनी अभिषेक करण्याची परंपरा आहे. ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबाबत दिलेली माहिती जाणून घेऊ.
advertisement
1/7
तयारी महाशिवरात्रीची! महादेवाच्या पिंडीवर या 5 गोष्टींनी अभिषेक करणे शुभफळदायी
जलाभिषेक - महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात आधी शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण केलं जातं. जलाभिषेक केल्याने मनाला शांतता मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात, असं मानलं जातं. तांब्याच्या कलशातून पाणी अर्पण करणं अधिक शुभ समजलं जातं.
advertisement
2/7
कच्चं दूध - शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करण्याची परंपरा फार जुनी आहे. यामुळे शरीराशी संबंधित आजार किंवा त्रास कमी होतात, असं मानलं जातं. ज्यांना संततीची इच्छा आहे अशा भक्तांसाठी दुधाचा अभिषेक खूप फलदायी ठरतो. मात्र दूध उकळलेलं नसावं, याची काळजी घ्यावी.
advertisement
3/7
मध - कामात सतत अडथळे येत असतील किंवा कोणाशी संवाद बिघडलेला असेल, तर मधाने अभिषेक करणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे बोलण्यात गोडवा येतो आणि बिघडलेले संबंध सुधारण्यास मदत होते.
advertisement
4/7
पंचामृत - दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास आयुष्यातील सुख-सोयी वाढतात, असं मानलं जातं. हा अभिषेक दिवसभरात कुठल्याही वेळी करता येतो.
advertisement
5/7
उसाचा रस - ज्यांना पैशांशी संबंधित अडचणी येत असतील किंवा आर्थिक चणचण जाणवत असेल, त्यांनी उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. उसाचा रस ताजा असणं गरजेचं आहे. यामुळे कामात स्थिरता येते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते, असं मानलं जातं.
advertisement
6/7
बेलपत्र आणि फुलं अर्पण करण्याची पद्धत - अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र नक्की अर्पण करावं. बेलपत्र तीन पानांचं असावं आणि ते फाटलेलं नसावं. यासोबत पांढरी फुलं, धोतरा आणि शमीची पानंही अर्पण केली जातात. बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी उलट्या बाजूने, म्हणजे मागचा भाग वर येईल अशा पद्धतीने ठेवावं.
advertisement
7/7
महाशिवरात्रीचे महत्त्वाचे नियम -या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि व्रताचा संकल्प करावा. पूर्ण उपवास शक्य नसेल, तर फलाहार करता येतो. या दिवशी मांसाहार, मद्यपान आणि तेलकट पदार्थ टाळावेत. विशेष म्हणजे शिवलिंगावर कधीही कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mahashivratri 2026: तयारी महाशिवरात्रीची! महादेवाच्या पिंडीवर या 5 गोष्टींनी अभिषेक करणे शुभ, धार्मिक महत्त्व
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल