Astrology: काऊंटडाऊन संपणार! गुरुवारी दुपारी 12.24 मिनिटांनंतर या राशींचे नशीब अनपेक्षित चमकेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Horoscope: नाताळच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला मंगळ ग्रह शुक्राच्या पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळाचं हे गोचर 2025 मधलं शेवटचं गोचर असणार आहे. सध्या मंगळ धनु राशीत आहे आणि धनु राशीतूनच तो पूर्वाषाढा नक्षत्रात जाणार आहे. मंगळ मूळ नक्षत्रातून बाहेर पडून दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषानुसार मंगळ ग्रह साहस, पराक्रम आणि धाडसाचं प्रतीक मानला जातो. मंगळाचा शुभ प्रभाव आत्मविश्वास, निडरता आणि विजयाची भावना वाढवतो. मंगळाचं हे नक्षत्र बदल 4 राशींसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. याचा परिणाम फक्त 2025 च्या शेवटपर्यंतच नाही, तर 2026 मध्येही दिसून येईल.
advertisement
1/4

मंगळाचं हे नक्षत्र गोचर मेष राशीच्या लोकांसाठी खास लाभदायक ठरणार आहे, कारण मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ आहे. या काळात मेष राशीचे लोक नवीन विचार शिकायला, उच्च शिक्षण घ्यायला किंवा परदेश प्रवासाकडे वळू शकतात. आत्मविश्वास आणि उत्साह वाढल्यामुळे तुम्ही तुमच्या दीर्घकालीन ध्येयांसाठी धाडसी निर्णय घेऊ शकाल. या गोचराचा फायदा फक्त या वर्षाच्या शेवटच्या दिवसांतच नाही, तर पुढील वर्षातही मिळत राहील. घर किंवा वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल आणि पैशांचे नवे मार्ग खुलतील.
advertisement
2/4
मंगळाचं नक्षत्र गोचर सिंह राशीच्या लोकांसाठीही खूपच छान ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील, ज्याचा फायदा 2026 मध्येही मिळेल. करिअरमध्ये प्रगती, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि ध्येयांकडे वाटचाल करण्यासाठी हा काळ ऊर्जा देणारा आहे. तुमच्यातील धाडस आणि आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणं सोपं जाईल. मात्र महत्त्वाकांक्षा जपून आणि समजूतदारपणे हाताळलीत तर या गोचराचा जास्त फायदा होईल. कुटुंब आणि जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल.
advertisement
3/4
वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ असल्यामुळे हे नक्षत्र गोचर या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. स्पर्धात्मक परीक्षा किंवा कामांमध्ये चांगले निकाल मिळू शकतात. आरोग्यही साधारणपणे चांगलं राहील. कर्ज घेण्याबाबत किंवा कर्ज फेडण्याबाबत प्रयत्न करत असाल, तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामांकडे ओढ वाढेल. मालमत्तेच्या व्यवहारात, व्यवसायात किंवा करिअरमध्ये फायदा होऊ शकतो आणि उत्पन्न वाढण्याची चिन्हं आहेत. मित्र आणि मुलांशी संबंधित गोष्टींमध्येही सकारात्मक परिणाम दिसतील.
advertisement
4/4
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचं हे नक्षत्र गोचर अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. मंगळ तुमची प्रतिष्ठा, नाव आणि सन्मान वाढवण्यास मदत करेल. या काळात तुम्ही स्पर्धकांपेक्षा पुढे राहाल आणि व्यवसायात उत्पन्न वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. धाडस वाढल्यामुळे कठीण निर्णय घेणं सोपं जाईल आणि अनेक अडचणींमधून मार्ग निघेल. नोकरी करणाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचं महत्त्व वाढेल. या काळात धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल आणि कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: काऊंटडाऊन संपणार! गुरुवारी दुपारी 12.24 मिनिटांनंतर या राशींचे नशीब अनपेक्षित चमकेल