'या' तारखेचे लोक असतात 'दिलफेक आशिक', एकाच नजरेत करतात घायाळ; तुमचा पार्टनरची बर्थडेट 'ही' नाही ना?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून तिच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडता येतात. ज्या व्यक्तींचा जन्म या तारखेला झालेला असतो त्या व्यक्ती अत्यंत आकर्षक, बोलक्या आणि प्रेमप्रकरणात 'डायहार्ड' प्रेमी असतात.
advertisement
1/7

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून तिच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडता येतात. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांचा 'मूलांक 5' असतो. या मूलांकाचा स्वामी 'बुध' ग्रह आहे. बुध हा बुद्धी, संवाद आणि चंचलतेचा कारक मानला जातो. याच कारणामुळे मूलांक 5 च्या व्यक्ती अत्यंत आकर्षक, बोलक्या आणि प्रेमप्रकरणात 'डायहार्ड' प्रेमी असतात.
advertisement
2/7
पहिल्या नजरेत पडतात प्रेमात: मूलांक 5 च्या व्यक्ती स्वभावाने अत्यंत चंचल असतात. त्यांना सौंदर्याची प्रचंड आवड असते. अनेकदा एखाद्या व्यक्तीला केवळ रस्त्यात पाहिल्यावर किंवा पहिल्या भेटीतच ते त्यांच्या प्रेमात पडतात. त्यांच्यासाठी 'लव्ह अॅट फर्स्ट साईट' ही गोष्ट अगदी सामान्य आहे.
advertisement
3/7
संभाषणाने करतात समोरच्याला घायाळ: या लोकांचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे त्यांची 'वाणी'. ते इतके गोड आणि प्रभावी बोलतात की समोरची व्यक्ती त्यांच्याकडे सहज आकर्षित होते. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि हजरजबाबी स्वभावाच्या जोरावर ते कोणाचेही मन जिंकण्यात पटाईत असतात.
advertisement
4/7
एका ठिकाणी मन रमत नाही: बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक एकाच गोष्टीवर जास्त काळ टिकून राहू शकत नाहीत. प्रेमाच्या बाबतीतही त्यांचे मन सतत बदलत असते. यामुळेच लग्नापूर्वी त्यांचे अनेक प्रेमसंबंध असण्याची शक्यता असते. त्यांना आयुष्यात सतत बदल आणि नवीनता आवडते.
advertisement
5/7
रोमँटिक आणि प्रयोगशील: मूलांक 5 चे लोक त्यांच्या जोडीदाराला नेहमी 'सरप्राईज' देण्यात पुढे असतात. त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळी असते. हे लोक केवळ 'आय लव्ह यू' म्हणण्यावर विश्वास ठेवत नाहीत, तर सहली, भेटवस्तू आणि रोमांचक अनुभवांतून प्रेम व्यक्त करतात.
advertisement
6/7
शारीरिक आकर्षणाला महत्त्व: अंकशास्त्रानुसार, या मूलांकाच्या व्यक्तींसाठी नात्यात भावनिक ओढ्यासोबतच शारीरिक संबंधांनाही विशेष महत्त्व असते. या बाबतीत ते खूप प्रयोगशील असतात आणि जोडीदाराकडूनही तशीच अपेक्षा ठेवतात.
advertisement
7/7
स्वातंत्र्यप्रिय स्वभाव: या लोकांना कोणाचेही बंधन आवडत नाही. जर त्यांच्या नात्यात जोडीदाराने जास्त टोकले किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली, तर हे लोक त्या नात्यातून लवकर बाहेर पडतात. त्यांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या वेगाशी जुळवून घेईल आणि त्यांना स्वतःची स्पेस देईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
'या' तारखेचे लोक असतात 'दिलफेक आशिक', एकाच नजरेत करतात घायाळ; तुमचा पार्टनरची बर्थडेट 'ही' नाही ना?