TRENDING:

Dreams Life: मेलेला माणूस स्वप्नात दिसण्याचा अर्थ..! अशा काही गोष्टी त्यानंतर लागोपाठ होऊ शकतात

Last Updated:
Dream Of Dead Meaning: झोपेत कित्येक स्वप्ने आपण पाहत असतो, पण स्वप्नात जर मयत व्यक्ती दिसली तर आपण त्या स्वप्नाला विसरू शकत नाही. कधी-कधी घाबरून जाग येते. असं स्वप्न का पडलं असेल असा आपण विचार करत राहतो. मृत व्यक्ती स्वप्नात दिसण्यामागे विविध गोष्टी कारण आहेत. वारलेले वडील स्वप्नात दिसणे हा एक विचित्र अनुभव असतो. वडील हे जीवनाचा आधारस्तंभ असतात. स्वप्न शास्त्रानुसार, असे स्वप्न विनाकारण येत नाही, त्यामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबाबत दिलेली माहिती जाणून घेऊ.
advertisement
1/7
मेलेला माणूस स्वप्नात दिसण्याचा अर्थ..! अशा गोष्टी त्यानंतर लागोपाठ होऊ शकतात
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात मृत वडील दिसणं नेहमी वाईट असतंच असं नाही. अनेक वेळा अशी स्वप्नं चांगला संकेत देणारी असतात. या स्वप्नाचा अर्थ वडील स्वप्नात कशा अवस्थेत दिसले आणि त्यावेळी त्यांचा भाव कसा होता यावर अवलंबून असतो. अशा स्वप्नातून असंही सूचित होतं की वडिलांचं अस्तित्व आजही तुमच्या आयुष्यात आहे. कदाचित ते तुम्हाला एखाद्या अडचणीतून वाचवण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी स्वप्नात आले असावेत.
advertisement
2/7
स्वप्नात मृत वडील निरोगी आणि हसताना दिसणे - स्वप्नात वडील आनंदी, शांत आणि हसताना दिसले, तर हे खूप शुभ मानलं जातं. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू कमी होतील. घरात सुख, समाधान आणि प्रगतीचे योग येतील. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि नशीब तुमच्या बाजूने फिरू शकतं.
advertisement
3/7
स्वप्नात मृत वडील आजारी दिसणे - स्वप्नात वडील आजारी, थकलेले किंवा अशक्त दिसले, तर हा अशुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या आरोग्याकडे किंवा घरातल्या कुणाच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच नकळत होत असलेल्या चुका थांबवण्याची ही वेळ आहे, असं हे स्वप्न सांगतं.
advertisement
4/7
स्वप्नात मृत वडिलांना पुन्हा मरताना पाहणं - स्वप्नशास्त्रानुसार असं स्वप्न चांगलं मानलं जात नाही. ते येणाऱ्या अडचणी, आर्थिक नुकसान किंवा घरात वाद होण्याचा संकेत आहे. कदाचित वडिलांना दिलेलं एखादं वचन अजून पूर्ण झालेलं नसेल. अशा वेळी ती अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
advertisement
5/7
स्वप्नात मृत वडील रडताना दिसणं - वडील स्वप्नात रडताना दिसले, तर हे त्यांच्या अपूर्ण इच्छांकडे लक्ष वेधतं. वडिलांची एखादी इच्छा किंवा स्वप्न अपूर्ण राहिलं असण्याची शक्यता असते. काही लोक हे पितृदोषाचं लक्षणही मानतात. अशा वेळी मन शांत ठेवावं आणि पितरांच्या नावाने दानधर्म किंवा पूजा करण्याचा विचार करावा.
advertisement
6/7
स्वप्नात वडील सल्ला देताना - स्वप्नात वडील तुम्हाला काही समजावत असतील, मार्ग दाखवत असतील किंवा हात धरून चालायला सांगत असतील, तर हे खूप चांगलं लक्षण मानलं जातं. याचा अर्थ त्यांचे आशीर्वाद अजूनही तुमच्यासोबत आहेत आणि लवकरच आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात.
advertisement
7/7
संकेत कसे ओळखायचे - स्वप्न पाहिल्यानंतर थोडा वेळ शांत बसून विचार करा. वडील स्वप्नात आनंदी होते की उदास, रागावलेले होते की शांत? त्यांनी काही बोललं का फक्त दिसले? स्वप्न पाहिल्यावर तुमचं मन कसं वाटत होतं? या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर स्वप्नाचा अर्थ समजायला मदत होते. पण, फक्त स्वप्नांवर विश्वास ठेवून आयुष्यातले मोठे निर्णय घेऊ नका. स्वप्न हा फक्त एक संकेत असू शकतो, तो भविष्याची खात्री नसतो. मनात भीती न ठेवता नेहमी सकारात्मक विचार ठेवा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Dreams Life: मेलेला माणूस स्वप्नात दिसण्याचा अर्थ..! अशा काही गोष्टी त्यानंतर लागोपाठ होऊ शकतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल