कपिल शर्माच्या शोमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची हजेरी
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीमने कपिलच्या सेटवर हजेरी लावली, पण चाहत्यांच्या नजरा मात्र एका चेहऱ्याला शोधत होत्या, ती म्हणजे स्मृती मानधना. सध्या पलाश मुच्छलसोबतच्या कथित वादामुळे स्मृती चांगलीच चर्चेत आहे. याच वादामुळेच स्मृतीने कपिलच्या शोकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच, कपिलच्या शोमध्ये स्मृती हजर नसल्याचे पाहताच चाहत्यांची निराशा झाली आहे. मात्र, स्मृती प्रत्यक्ष सेटवर नसली तरी गप्पांच्या ओघात तिचं नाव मात्र वारंवार घेतलं गेलं.
advertisement
'माझं घर गेलं...', आगीत जळून खाक झालं मराठमोळ्या अभिनेत्याचं घर, समोर आले काळीज चिरणारे PHOTO
हरमन प्रीतला मिळाली होती धमकी!
शोच्या प्रोमोमध्ये नेहमीप्रमाणे जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या विनोदी शैलीने मंचावर कल्ला केला. वर्ल्ड कप फायनल जिंकल्यानंतर हरमनप्रीतने ट्रॉफी उचलण्यापूर्वी जो भांगडा केला होता, त्यामागचं गुपित जेमिमाने उघड केलं. जेमिमा म्हणाली, "हॅरी दीदी आमचं कोणाचंच ऐकत नाही, पण स्मृतीने तिला स्पष्ट धमकी दिली होती की, जर तू डान्स केला नाहीस, तर मी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही!" या गोड धमकीमुळेच हरमनप्रीतने मैदानावर ठेका धरला होता, हे ऐकून कपिललाही हसू आवरलं नाही.
कपिल बनला मॅचमेकर
नेहमीप्रमाणे यावेळीही कपिलने खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी सोडली नाही. त्याने गोलंदाज रेणुका सिंहला तिच्या आइडियल बॉयबद्दल प्रश्न विचारून चांगलंच भंडावून सोडलं. तर दुसरीकडे, शेफाली वर्माच्या गंभीर उत्तरांवर कपिलने आपल्या खास शैलीत पंच मारला, "अगं, इतकी रागवतेस का? मी फक्त विचारलं!" या एपिसोडमध्ये हरमनप्रीत, रिचा घोष, दीप्ती शर्मा यांसारख्या खेळाडूंसह हेड कोच अमोल मजुमदार यांनीही हजेरी लावली आहे.
मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी सुनील ग्रोवर आणि कृष्णा अभिषेक 'करण-अर्जुन' बनून आले आहेत, तर किकू शारदा त्यांची फिल्मी आई बनून प्रेक्षकांना हसवत होते.
'कपिल शर्मा शो' कायद्याच्या कचाट्यात
एकीकडे हा शो वर्ल्ड कप विजयाचं सेलिब्रेशन करत असतानाच, कपिल शर्मा एका कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. 'पीपीएल इंडिया'ने मुंबई हायकोर्टात कपिल शर्मा आणि नेटफ्लिक्स विरोधात कॉपीराईट उल्लंघनाचा खटला भरला आहे. तिसऱ्या सीझनमधील काही गाणी विनापरवाना वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
