TRENDING:

दहाव्या मजल्यावरुन कोसळला व्यक्ती अन् आठव्या मजल्यावरच्या जाळीत अडकला,अग्निशमन दलाकडून रेस्क्यू,VIDEO

Viral

गुजरातमधील सुरतच्या रांधेर परिसरातील टाइम गॅलक्सी इमारतीमधून एक व्यक्ती दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला.पण नशीबाने त्याचा आठव्या मजल्यावरच्या जाळीत पाय अडकला. अग्निशमन दलाला कळवताच त्याला अग्निशमन दलाकडून रेस्क्यू करण्यात आले.

Last Updated: Dec 25, 2025, 16:55 IST
Advertisement

आरसा फक्त चेहरा बघायला नसतो! मुलांच्या प्रगतीसाठी आरसा ठरू शकतो 'गुरू'; समुपदेशक उमा पाटील यांनी सांगितलं मोठं गुपित!

Viral

आजच्या धावपळीच्या युगात पालकांनो, तुमची मुलं एकलकोंडी किंवा रागीट होत आहेत का? त्यांच्यातील कमी होत असलेला आत्मविश्वास ही चिंतेची बाब ठरू शकते. पण यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय पुण्याच्या समुपदेशक उमा पाटील यांनी सुचवला आहे, तो म्हणजे 'मिरर टॉक'. आरशासमोर उभं राहून स्वतःशी संवाद साधल्याने मुलांची देहबोली, उच्चार आणि आत्मविश्वास कसा वाढतो? आरशातल्या प्रतिबिंबाला 'गुरू' मानल्याने मुलांच्या भविष्यात काय बदल होतील? जाणून घेण्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा !

Last Updated: Dec 25, 2025, 18:16 IST

गडकरींनी सांगितले उमेदवारांचे गमतीदार किस्से, VIDEO

भाजप मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरच्या एका कार्यक्रमातील भाषणात त्यांच्या पार्टीचे गमतीदार किस्से सांगितले आहेत. ते म्हणाले,"प्रत्येक व्यक्ती वाट पाहत आहे की निवडणुक कधी आहे आणि मला ते तिकिट देऊन कधी पाठवणार.लोक म्हणतात, तुम्हाला कोण दुसरं मिळालं नाही का ?"

Last Updated: Dec 25, 2025, 18:15 IST
Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य ड्रोन शो..VIDEO

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पासून सुरु करण्यात आलं. तेव्हा विमानतळ सुरु होण्यापूर्वी हा ऐतिहासिक क्षण कायम उपस्थितांच्या स्मरणात राहण्यासाठी एक नेत्रदीपक ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होत.त्यात अनेक आकर्षक आकृती साकारण्यात आल्या होत्या.

Last Updated: Dec 25, 2025, 17:44 IST

स्टॉक एसआयपीमध्ये पैसे गुंतवताना \'या\' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत!

Share Market

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वाढलेले प्रमाण आणि त्याबद्दलच्या वाढलेल्या जागरूकतेमुळे  गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जाताहेत. यामुळं एसआयपीकडे कित्येक लोकांची पाऊल वळताना दिसत आहेत. असाच म्युचुअल फंडातील एसआयपी सोबतच स्टॉक एसआयपी मध्येही बरेच लोक गुंतवणूक करताना दिसत आहेत. मग हा मुद्दा उभा राहतो की म्युचुअल फंडमधील एसआयपी चांगली की स्टॉक एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या संदर्भात आपण गुंतवणूक सल्लागार रुचीर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत.

Last Updated: Dec 25, 2025, 17:40 IST
Advertisement

सुषमा अंधारेंचं नवनीत राणांना प्रतिउत्तर, म्हणाल्या, \"डोहाळे जेवणाचा खर्च आम्ही करु\"

भाजपा नेत्या नवणीत राणा यांनी हिंदूं लोकांना '3-4 मुलं जन्माला घालावीत' असा अजब सल्ला दिला होता. तेव्हा विरोधकांनी तिचा चांगलाच समाचार घेतला. त्यातील शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर प्रहार करत म्हणाल्या, "अमरावतीच्या कित्येक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे.पण त्यावर त्या बोलत नाहीत.मग आम्ही त्यांना म्हणतो, सुरुवात तुमच्यापासून करा.डोहाळे जेवणाचा खर्च आम्ही करु"

Last Updated: Dec 25, 2025, 17:18 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
दहाव्या मजल्यावरुन कोसळला व्यक्ती अन् आठव्या मजल्यावरच्या जाळीत अडकला,अग्निशमन दलाकडून रेस्क्यू,VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल