'माझ्या तब्येतीबद्दल...' पायाच्या दुखापतीमुळे Bigg Boss मधून बाहेर आला आयुष संजीव? दिली हेल्थ अपडेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 6 मधून अभिनेता आयुष संजीव घराबाहेर गेला. घराबाहेर आल्यानंतर त्याने पहिली पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
1/8

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीच्या 6 व्या सीजनमध्ये यंदाचा आठवडा धक्कादायक ठरला. या आठवड्यात डबल इविक्शन झालं. यात प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर आले.
advertisement
2/8
आयुषचं घराबाहेर पडणं अनेकांसाठी धक्कादायक होतं कारण सगळेच त्याला शोचा विनर म्हणून पाहत होते. आयुषच्या पायाला देखील दुखापत झाली होती.
advertisement
3/8
पायाच्या दुखापतीमुळे तो स्वत: बाहेर आला असावा असं अनेकांना वाटलं होतं. खरंच असं झालं का? आयुषने घराबाहेर आल्यानंतर पोस्ट लिहित त्याच्या तब्येतीची अपडेट दिली आहे.
advertisement
4/8
आयुष घरातून बाहेर पडला आणि त्याच्या घरी गेला तेव्हा त्याची आवडती क्रिकेट मॅच सुरू होती. ती मॅच पाहत असतानाचा फोटो त्याने शेअर केलाय. या फोटोसह आयुषनं पोस्ट लिहित म्हटलं, "बाहेर पडण्याचा दिवस किती छान आहे. चांगल्या आणि कठीण आठवणींचं मिश्रण… नियतीपेक्षा मोठं काहीच नाही".
advertisement
5/8
आयुषच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या तब्येचीही काळजी व्यक्त केली होती. त्याबद्दल त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, "माझ्या तब्येतीबद्दल काळजी करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो की मी एक-दोन आठवड्यांत पूर्णपणे बरा होईन." घरात असतानाही काही टास्कदरम्यान त्रास होत होता. त्याला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलं होतं.
advertisement
6/8
आयुषनं पोस्टच्या शेवटी लिहिलंय, "तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद. सदैव ऋणी आहे. मी परत येईन, बिगर अँड बेटर. लवकरच भेटू".
advertisement
7/8
अनेकांना आयुष बिग बॉस मराठी 6 चा विजेता होईल असं वाटलं होतं. पण कमी वोट्स मिळाल्याने आयुषची घरातून एक्झिट झाली. त्याची एक्झिट प्रेक्षकांसाठी अनपेक्षित ठरली.
advertisement
8/8
आयुषची पोस्ट समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला 'लवकर बरा हो', 'तू खरा विजेता आहेस' अशा कमेंट्स करत सपोर्ट केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्या तब्येतीबद्दल...' पायाच्या दुखापतीमुळे Bigg Boss मधून बाहेर आला आयुष संजीव? दिली हेल्थ अपडेट