TRENDING:

एअर इंडियावर DGCA कडून मोठी कारवाई, 10000000 रुपयांचा दंड, कारण काय?

Last Updated:
DGCA ने एअर इंडिया ला ARC सर्टिफिकेट नसताना ८ वेळा उड्डाण केल्याबद्दल १ कोटी दंड ठोठावला. कॅम्पबेल विल्सन यांना नोटीस पाठवली. कंपनीने चूक मान्य केली.
advertisement
1/6
एअर इंडियावर DGCA कडून मोठी कारवाई, 10000000 रुपयांचा दंड, कारण काय?
देशातील आघाडीची विमान कंपनी एअर इंडियाला नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच महागात पडले आहे. आवश्यक सेफ्टी सर्टिफिकेट न घेता विमानांची उड्डाणे केल्याप्रकरणी DGCA ने कंपनीला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे, ही चूक एकदा किंवा दोनदा नव्हे, तर तब्बल ८ वेळा करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं.
advertisement
2/6
एअर इंडियाच्या एअरबस ए-३२० या विमानांनी आवश्यक परवानग्या न घेता उड्डाण भरले होते. DGCA च्या नियमानुसार, प्रत्येक विमानाला दरवर्षी ARC सर्टिफिकेट घेणं बंधनकारक असतं. हे सर्टिफिकेट विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध करते. मात्र, २४-२५ नोव्हेंबर २०२५ रोजी एअर इंडियाने हे प्रमाणपत्र नसतानाही नवी दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद यांसारख्या शहरांसाठी कनेक्टिंग फ्लाईट्स चालवल्या.
advertisement
3/6
DGCA ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत एअर इंडियाच्या टॉप मॅनेजमेंटला जबाबदार धरलं. "प्रवाशांचा जीव धोक्यात घालणं हे गंभीर आहेच पण अशाप्रकारे नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे" जेणेकरुन पुन्हा हे धाडस केलं जाणार नाही.
advertisement
4/6
एअर इंडियाच्या या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढून महासंचालनालयाने ही कारवाई केली. याप्रकरणी एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना नोटीस पाठवून जाब विचारण्यात आला होता. त्यावर, "ही चूक मुद्दाम केलेली नाही, भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही," असं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं.
advertisement
5/6
ऑगस्ट २०२५ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर DGCA सर्व विमान कंपन्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे. विशेषतः सुरक्षा मानकांबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जात नाहीये. एअर इंडियावर झालेली ही कारवाई इतर विमान कंपन्यांसाठीही मोठा धडा मानली जात आहे.
advertisement
6/6
एअर इंडियाने आपली चूक मान्य करत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. मात्र, तांत्रिक प्रमाणपत्र नसताना ८ वेळा उड्डाणे होणे, हे एअरलाईन्सच्या अंतर्गत सुरक्षा तपासणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. सध्या कंपनी आपल्या त्रुटी सुधारण्यासाठी DGCA सोबत काम करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
एअर इंडियावर DGCA कडून मोठी कारवाई, 10000000 रुपयांचा दंड, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल