TRENDING:

एक दोन नाही 15 गाड्या एकमेकांवर धडकल्या, कुठे आणि कसा झाला अपघात, पाहा PHOTO

Last Updated:
या अपघातात ४ पुरुष, ३ महिला आणि ३ लहान मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास झाल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
1/5
एक दोन नाही 15 गाड्या एकमेकांवर धडकल्या, कुठे आणि कसा झाला अपघात, पाहा PHOTO
शनिवारची सकाळ पानिपत जिल्ह्यासाठी अपघाताची बातमी घेऊन आली. सलग दोन दिवस झालेल्या पावसानंतर आज सकाळी संपूर्ण जिल्हा धुक्याच्या पांढऱ्या चादरीत हरवला होता. हायवेवर ५ मीटरवरचंही काही दिसत नव्हतं. याच धुक्यामुळे सिवाह बस स्टँडजवळ भीषण साखळी अपघात झाला, ज्यामध्ये १५ वाहनांचा चक्काचूर झाला.
advertisement
2/5
या अपघातात ४ पुरुष, ३ महिला आणि ३ लहान मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. चंदीगडहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर एक ट्रक तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता.
advertisement
3/5
धुकं इतकं दाट होतं की मागून येणाऱ्या वाहनचालकांना हा उभा असलेला ट्रक दिसलाच नाही. एका भरधाव ट्रकने या उभ्या ट्रकला जोरात धडक दिली आणि त्यानंतर मागे येणारे ४ ट्रक आणि अनेक कार एकामागोमाग एक एकमेकांवर आदळत गेल्या.
advertisement
4/5
अपघात इतका भयानक होता की गाड्यांचे सुटे भाग हायवेवर विखुरले गेले. ट्रकांच्या धडकेनंतर मागून येणाऱ्या छोट्या कारही या 'चेन रिअ‍ॅक्शन'चा शिकार झाल्या. यामुळे दिल्लीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत हायवेवर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.
advertisement
5/5
पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे काम सुरू केले. सुमारे दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर पावणे नऊच्या सुमारास हायवेची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर अडकलेली वाहनं हळूहळू पुढे सरकू लागली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
एक दोन नाही 15 गाड्या एकमेकांवर धडकल्या, कुठे आणि कसा झाला अपघात, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल