हे पॅचेस तेल नाभी मधून बाहेर येऊ नये, आपल्याला कपड्यांना लागू नये. यासाठी फायदेशीर असतात. तुम्ही याऐवजी केवळ कॅस्टर ऑइल लावून झोपलात तरीदेखील तुम्हाला तितकाच फायदा होऊ शकतो. कॅस्टर ऑइलच्या फायद्यांबद्दल न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती दिली आहे.
कॅस्टर ऑइल पॅचेस नाभीवर कसे लावावे?
कॅस्टर ऑइल पॅचेस नाभीवर लावणे म्हणजे थोडक्यात चिकटपट्टीच्या साहाय्याने तेल लावणे. यासाठी सगळ्यात आधी एका कापसाच्या बोळ्यावर किंवा कापडावर कॅस्टर ऑइल टाका. हा कापसाचा बोळा नाभीवर ठेवा आणि त्यावरती चिकटपट्टी लावा. काही तास किंवा रात्रभर हा पॅच असाच राहू द्या. तुम्ही आठवड्यातून 4 वेळा किंवा नियमित याचा वापर करू शकता अस तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
कॅस्टर ऑइल पॅचेस नाभीवर लावण्याचे फायदे..
- नाभीवर कॅस्टर ऑइल लावल्याने पचनक्रिया सुधारते, पोट फुगणे कमी होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
- आयुर्वेदानुसार, नाभीचा भाग पचनशक्तीशी संबंधित आहे. हे पॅचेस नियमित वापरल्यास पचनात थोडी सुधारणा होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.
- हे पॅचेस मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम देऊ शकतात. परंतु प्रत्येकाच्या शरीरानुसार याचे फायदे कमी जास्त होऊ शकतात.
या गोष्टीही आहेत महत्त्वाच्या..
काही तज्ञांच्यामते, कॅस्टर ऑईलचा वापर मर्यादित काळासाठी सुरक्षित आहे. मात्र तरीही दीर्घकाळ वापरल्यास किंवा रात्रभर लावल्यास त्वचेची जळजळ, त्वचेची छिद्रे बंद होणे किंवा मुरुमे अशा समस्या येऊ शकतात.
- संवेदनशील त्वचा, ॲलर्जी किंवा त्वचेच्या समस्या आहेत अशा लोकांनी शक्यतो याचा वापर टाळावा.
- त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनाही याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
