advertisement

Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO

Last Updated:

Summer Recipe: ही चटणी भाकरी, पोळी किंवा साध्या वरण-भातासोबत खाल्ल्यास जेवणाची चव दुप्पट होते.

+
Summer

Summer Recipe: उन्हाळ्यात भाजीला काय? कांद्याची चटणी बेस्ट पर्याय, अशी बनवा, सगळे पनीर विसरतील, Video

अमरावती: उन्हाळा सुरू झाला की घराघरात कांद्याची सुकी भाजी हमखास बनवली जाते. मात्र रोज त्याच चवीचा कंटाळा येऊ लागतो. अशावेळी काहीतरी वेगळं आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते. यासाठीच आज उन्हाळ्यासाठी खास कांद्याची झणझणीत चटणीची सोपी रेसिपी लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
कांदा चटणीसाठी साहित्य
या चटणीसाठी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी चिरलेले टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, तेल, जिरे, मोहरी, बडीशेप, हळद, मीठ, धने पूड आणि गूळ लागतो. तसेच 4 ते 5 लाल मिरच्या आणि थोडी चिंच आवश्यक आहे.
advertisement
चटणी बनविण्याची कृती
चटणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम चिंच आणि लाल मिरच्या कोमट पाण्यात सुमारे 15 मिनिटे भिजत ठेवाव्यात. त्यानंतर त्यांचे मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करावे. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि बडीशेप टाकून फोडणी द्यावी. फोडणी तडतडल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यावा.
कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात टोमॅटो घालून नरम होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर लसूण पेस्ट, मीठ, हळद आणि धने पूड घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. हे मिश्रण सुमारे 5 मिनिटे शिजू द्यावे. यानंतर तयार केलेले चिंच-मिरचीचे वाटण त्यात घालून पुन्हा चांगले मिक्स करावे. त्यात गूळ टाकून गूळ पूर्ण विरघळेपर्यंत चटणी शिजवावी.
advertisement
शेवटी कोथिंबीर घालून हलकेच मिक्स करावे. अशा प्रकारे चटपटीत आणि झणझणीत कांद्याची उन्हाळा स्पेशल चटणी तयार होते. ही चटणी भाकरी, पोळी किंवा साध्या वरण-भातासोबत खाल्ल्यास जेवणाची चव दुप्पट होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement