Sindhudurg - Mumbai : रेल्वेचं वेटिंग अन् रस्त्याचं ट्राफिक, नादच सोडा, कोकणात जायला नवा पर्याय, आठवड्याचे सातही दिवस बिनधास्त निघा
Last Updated:
Mumbai Sindhudurg Flights : मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यानच्या विमानसेवेमध्ये एक मोठी अपडेट आली आहे,यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा पर्याय मिळणार असून पर्यटन आणि स्थानिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
मुंबई : सिंधुदुर्गकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. चिपी(सिंधुदुर्ग) विमानतळावरुन गेल्या काळापासून मुंबई अशी विमानसेवा सुरु आहे. मात्र आता ती आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार असल्याची माहिती समोर आली असून यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
कोकणची वारी आता विमानाने
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. इथं देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. परंतू सिंधुदुर्ग-मुंबई सेवा बंद असल्याने त्याचा मोठा परिणाम पर्यटनावर होत होता. पण आता शासनाच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वाढत्या पर्यटनाचा फायदा स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि खाजगी चालकांना होणार आहे.
एवढंच नाही तर मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान दररोज विमान सेवा सुरु झाल्याने व्यापारी उलाढालही वाढेल आणि सण-उत्सवाच्या दिवसांत चाकरमान्यांना आता अजून एक नवा पर्याय उपल्बध होईल.
advertisement
मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आता काही तासांच्या अंतरावर
मुंबईला अनेक मोठ-मोठी रुग्णालय आहेत. देशभरातील अनेकजण मुंबईत येऊन उपचार घेत असतात. त्यात ही सेवा सुरु झाल्यास सिंधुदुर्गातून मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 11:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurg - Mumbai : रेल्वेचं वेटिंग अन् रस्त्याचं ट्राफिक, नादच सोडा, कोकणात जायला नवा पर्याय, आठवड्याचे सातही दिवस बिनधास्त निघा







