Virat Kohli : 'गोष्टी अवघड होणारेत, तुम्हाला 120 टक्के...', पहिल्याच मॅचआधीच किंग कोहलीची RCB च्या खेळाडूंना वॉर्निंग!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli Warning For RCB Teammates : विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आणि या सीझनमध्ये अधिक मेहनत घेण्याचं आवाहन करताना दिसत आहे.
IPL 2026 RCB News : यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना डिफेन्डिंग चॅम्पियन असणाऱ्या आरसीबीचा असणार आहे. 28 मार्च रोजी आयपीएलचं बिगुल वाजणार असून गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील मॅचने हंगामाची सुरुवात होणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सलामीच्या मॅचसाठी आरसीबीचे आयकॉनिक खेळाडू आणि विराट कोहलीने सराव सुरू केला आहे. अशातच आता आयपीएल सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने आरसीबीच्या खेळाडूंना वॉर्निंग दिली आहे.
मेहनतीमुळे आपण यश मिळवलं पण... - विराट कोहली
आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सराव शिबिराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आणि या सीझनमध्ये अधिक मेहनत घेण्याचं आवाहन करताना दिसत आहे. "गेल्या 2-3 वर्षांच्या कठोर मेहनतीमुळे आपण जे यश मिळवलं, ते टिकवून ठेवणं आता अधिक आव्हानात्मक असेल," असं कोहलीनं आपल्या भाषणात म्हटलं आहे.
advertisement
Head Coach Andy Flower’s welcome to the new members of the squad, and Virat’s pep talk in the first practice session of #IPL2026 at ನಮ್ಮ Chinnaswamy.
Watch more on @bigbasket_com presents RCB Bold Diaries. #PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/ee8mPnIgWb
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 20, 2026
advertisement
एकही मिनिट वाया घालवायचा नाहीये - विराट कोहली
विराटने खेळाडूंना सतर्क राहण्याचा सल्ला देत म्हटले की, "आपल्याला सरावाचा एकही मिनिट वाया घालवायचा नाहीये. पुढच्या अडीच महिन्यांसाठी प्रत्येकाने आपले 120 टक्के योगदान दिलं पाहिजं. सर्वांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून आपण पुन्हा एकदा चॅलेंजर म्हणून सज्ज आहोत, हे स्पष्ट दिसत आहे.", असंही विराट कोहली यावेळी म्हणाला.
advertisement
टायटल डिफेन्ड करणं महत्त्वाचं
दरम्यान, चॅम्पियनशीपचं टायटल जिंकण्यापेक्षा टायटल डिफेन्ड करणं महत्त्वाचं असतं, हे विराटला नक्कीच माहिती आहे. आरसीबीने 2025 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या फायनलमध्ये पंजाब किंग्सचा 6 रन्सने पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं. अशातच आता आरसीबीला पुन्हा ट्रॉफी आपल्याकडेच ठेवायची आहे. त्यासाठी विराटसेना आक्रमक प्रहार करताना दिसेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 10:53 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : 'गोष्टी अवघड होणारेत, तुम्हाला 120 टक्के...', पहिल्याच मॅचआधीच किंग कोहलीची RCB च्या खेळाडूंना वॉर्निंग!









