advertisement

पुणे-पिंपरीतील 'स्पा सेंटर्स'चं काळं सत्य! या बड्या नावांची साखळी रडारवर; पुढच्या 90 दिवसांत 'मोठा गेम'

Last Updated:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 'स्पा आणि वेलनेस सेंटर्स'च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांचा मुद्दा आता थेट विधान परिषदेत गाजला आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते उद्योग (प्रतिकात्मक फोटो)
स्पा सेंटरच्या नावाखाली नको ते उद्योग (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : आयटी हब आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अजब घटना समोर आल्या आहेत. याच 'स्पा आणि वेलनेस सेंटर्स'च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक कृत्यांचा मुद्दा आता थेट विधान परिषदेत गाजला आहे. आमदार अमित गोरखे यांनी या 'स्पा सिंडिकेट'कडे लक्ष वेधलं. यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी येत्या तीन महिन्यांत स्पा व्यवसायासाठी स्वतंत्र आणि अतिशय कडक नियमावली लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.
आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेत सांगितले की, "शहरात शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या या दलदलीत फसून बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अमली पदार्थ आणि मानवी तस्करीचे अड्डे बनले आहेत." या व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा अहवाल मागवण्यात आला असून त्यासाठी विशेष समितीही स्थापन करण्यात आली आहे.
advertisement
पिंपरी-चिंचवडमध्ये काही ठराविक लोकांची संघटित साखळी हा काळा बाजार चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामध्ये नायडू, पटेल, शेख, फकीर, अधिकारी, बांदोडकर अशा टोळ्यांची नावे सभागृहात घेण्यात आली. या मास्टरमाइंड्सच्या मालमत्तांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नवीन नियमावली काय असू शकते?
सरकार लवकरच जाहीर करणाऱ्या नियमावलीत स्पा सेंटरमधील सीसीटीव्ही बंधनकारक करणे, कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी, अंतर्गत रचनेत पारदर्शकता आणि वेळमर्यादा यांसारखे कडक नियम असण्याची शक्यता आहे. या पावलामुळे स्पाच्या नावाखाली देहविक्रय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-पिंपरीतील 'स्पा सेंटर्स'चं काळं सत्य! या बड्या नावांची साखळी रडारवर; पुढच्या 90 दिवसांत 'मोठा गेम'
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement