advertisement

IPL सुरू होण्याआधीच BCCI ची मोठी घोषणा! तब्बल 18 वर्षानंतर या ठिकाणी खेळणार टीम इंडिया! पण कॅप्टन कोण?

Last Updated:

BCCI Announced Schedule of India Tour of Ireland : टीम इंडिया येत्या जून महिन्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याची घोषणा बीसीसीआयने शनिवारी सोशल मीडिया अकाऊंटवरून केली.

India Tour of Ireland announced
India Tour of Ireland announced
India Tour of Ireland announced : सध्या सर्वत्र आयपीएल 2026 चा रंग चढला आहे. आयपीएलला सुरू होण्यासाठी अजून आठवडा बाकी असताना सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकतीच टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरून आली असताना बीसीसीआयने आगामी शेड्युल देखील टाईट केलं आहे. अशातच आयपीएल सुरू होण्याआधीच बीसीसीआयने एक अधिकृत घोषणा केली आहे. टीम इंडिया येत्या जून महिन्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याची घोषणा बीसीसीआयने शनिवारी सोशल मीडिया अकाऊंटवरून केली.

टी-ट्वेंटी मालिकेचे अधिकृत वेळापत्रक 

भारतीय क्रिकेट संघ जून 2026 मध्ये आयर्लंडचा दौरा करणार असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी या टी-ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, 18 वर्षांनंतर भारतीय टीम पुन्हा एकदा बेलफास्टमध्ये खेळताना दिसणार आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. बीसीसीआयने जाहीर केल्यानुसार, भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन टी-20 मॅचेसची मालिका खेळवली जाईल. या दोन्ही मॅचेस बेलफास्ट येथील 'स्टॉर्मोंट क्रिकेट ग्राऊंड'वर होणार आहेत.
advertisement

2007 नंतर पहिल्यांदाच...

भारतीय संघ 2007 नंतर पहिल्यांदाच बेलफास्टमध्ये आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. यापूर्वीचे 2018, 2022 आणि 2023 मधील दौरे प्रामुख्याने डब्लिन (मॅलाहाइड) येथे झाले होते. अलीकडेच टी-20 वर्ल्ड कप 2026 चे जेतेपद पटकावल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा पहिलाच आणि महत्त्वाचा परदेश दौरा असेल. आयर्लंडविरुद्धच्या या दोन मॅचेस संपल्यानंतर भारतीय संघ थेट इंग्लंडला रवाना होईल. तिथे 1 जुलैपासून 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचेसची मोठी मालिका खेळवली जाणार आहे.
advertisement

आयर्लंडचा संघ नव्या नेतृत्वाखाली खेळणार

दरम्यान, आयर्लंडचा अनुभवी खेळाडू पॉल स्टर्लिंगने टी-20 कर्णधारपदावरून निवृत्ती घेतल्याने, या मालिकेत आयर्लंडचा संघ नव्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन वनडे मॅचेसची मालिका खेळणार आहे, जी 20 जून रोजी संपेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL सुरू होण्याआधीच BCCI ची मोठी घोषणा! तब्बल 18 वर्षानंतर या ठिकाणी खेळणार टीम इंडिया! पण कॅप्टन कोण?
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement