TRENDING:

चालत्या दुचाकीचं टायर फुटलं, आई-वडिलांसमोरच चिमुकल्या स्वराजसोबत भयंकर घडलं... सोलापुरात हळहळ

Last Updated:

Solapur News: अक्षय हे चिंचोळी एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी आलेगावकडे निघताना स्वराजला पुढे बसवलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : नेहमी हसतमुख चेहरा, खेळकर आणि खोडकर असल्यानं सगळ्यांनाच आपलंसं करणारा अवघ्या 5 वर्षांचा चिमुकला स्वराज अक्षय पुल्लूर... शुक्रवारी आई-वडिलांसह मोठ्या उत्साहात घरातून निघालेला हा लहानगा काळाच्या पडद्याआड कायमचा निघून गेला. आई-वडिलांसमोरच रक्तबंबाळ होऊन त्याने डोळे मिटले. हे दृश्य आणि आई-वडिलांचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.
चालत्या दुचाकीचं टायर फुटलं, आई-वडिलांसमोरच होत्याचं नव्हतं झालं, चिमुकला स्वराज... सोलापुरात भयंकर घडलं
चालत्या दुचाकीचं टायर फुटलं, आई-वडिलांसमोरच होत्याचं नव्हतं झालं, चिमुकला स्वराज... सोलापुरात भयंकर घडलं
advertisement

चिंचोली एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असणारे अक्षय परमेश्वर पुल्लूर (वय 37) हे पत्नी शकुंतला, मुलगा स्वराज आणि मुलाचा मित्र निखिल (वय 8) यांना घेऊन दुचाकीवरून चौबल सीट सोलापूरकडे येत होते. 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवाजीनगर येथे विनय हॉटेलसमोर दुचाकीचं टायर फुटलं.

Solapur: बायको माहेराहून येईना, भीमाने तिन्ही लेकरांना शेतात घेऊन गेला अन्...,घटनेनं अख्खं गाव हादरलं

advertisement

नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. स्वराजचं डोकं दुभाजकावर आदळलं आणि तो रक्तबंबाळ होऊन पडला. चिमुकल्या स्वराजनं आई-वडिलांसमोरच शेवटचा श्वास घेतला. निखिल आणि अक्षय हे गंभीर जखमी झाले, तर शकुंतला दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला पडली.

View More

अक्षय हे चिंचोळी एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी आलेगावकडे निघताना स्वराजला पुढे बसवलं होतं. निखिलची परीक्षा असल्याने त्याला सोडण्यासाठी शकुंतला मागे बसली होती. घटना घडताच बघ्यांची गर्दी जमली, पण राधा इंगळे या धावत आल्या आणि जखमींना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी स्वराजला मृत घोषित केले. शकुंतलाला खासगी हॉस्पिटलनंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, सदर अपघाताची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली असून, हवालदार महिंद्र गायकवाड तपास करत आहेत. दुपारी शवविच्छेदनानंतर स्वराजचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
चालत्या दुचाकीचं टायर फुटलं, आई-वडिलांसमोरच चिमुकल्या स्वराजसोबत भयंकर घडलं... सोलापुरात हळहळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल