TRENDING:

Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरचं तनुज गोवळकरसोबत दुसरं लग्न; मग कोण होता पहिला नवरा?

Last Updated:
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसरं लग्न करत आपल्या नवऱ्याची सगळ्यांना ओळख करून दिली. त्याचं नाव तनुज गोवळकर असल्याचं तिनं सांगितलं. पण तिचा पहिला नवरा कोण होता, हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/7
अपूर्वा नेमळेकरचं तनुज गोवळकरसोबत दुसरं लग्न; मग कोण होता पहिला नवरा?
सगळ्यांची लाडकी शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकरने वॅलेंटाइन डेला लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अपूर्वाने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत भलीमोठी पोस्ट लिहिली. ज्यात तिने 'सेकंड बिगनिंग' असं म्हटलं.
advertisement
2/7
अपूर्वाचं हे दुसरं लग्न आहे. काही महिन्यांआधीच अपूर्वाने तिला दुसरं लग्न करायचं आहे, प्रेमाला दुसरा चान्स द्यायचा आहे असं सांगितलं होतं.
advertisement
3/7
अपूर्वाचं पहिलं लग्न 2014 साली झालं होतं. तिने लव्ह मॅरेज केलं होतं. मुंबईत पारंपारिक पद्धतीने तिचा विवाहसोहळा पार पडला होता.
advertisement
4/7
अपूर्वा पहिल्या नवऱ्याला खूप वर्ष आधीपासून ओळखत होती. 10 वर्षे ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांनी लग्न केलं.
advertisement
5/7
पण लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. त्यांचं लग्न दीड वर्षही टिकलं नाही. त्यांनी घटस्फोट घेतला.  डिवोर्सनंतर अपूर्वा इतकी वर्षे सिंगलच होती.
advertisement
6/7
आता अपूर्वाने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली, तिचा दुसरा नवरा ज्याचं नाव  तनुज गोवळकर असं आहे. पण मग अपूर्वाचा पहिला नवरा कोण होता, तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
7/7
अपूर्वाचा पहिला नवरा ज्याचं नाव रोहन देशपांडे, जो राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. एका पक्षाचा तो पदाधिकारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरचं तनुज गोवळकरसोबत दुसरं लग्न; मग कोण होता पहिला नवरा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल